राज्यस्तरीय क्रीडा यशाचा सुवर्णक्षण : ए. टी. झांबरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सन्मान
![]()
राज्यस्तरीय क्रीडा यशाचा सुवर्णक्षण : ए. टी. झांबरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सन्मान
जळगाव प्रतिनिधी
ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथील कु. प्रांजल प्रेमानंद सपकाळे व आयुष संदीप राजपूत या होतकरू विद्यार्थ्यांनी तायक्वांदो, कराटे व मल्लखांब या क्रीडाप्रकारांत राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये अनुक्रमे सुवर्ण व कास्य पदकांची कमाई करून शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे.
या उल्लेखनीय क्रीडायशाबद्दल राणी लक्ष्मीबाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव येथे आयोजित विशेष कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उपप्राचार्य मा. श्री. विलास भोळे यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या मेहनत, सातत्य व शिस्तीचे विशेष कौतुक केले.
सन्मान सोहळ्याच्या प्रसंगी प्रांजल व आयुष यांनी खेळांचे जीवनातील महत्त्व, शारीरिक तंदुरुस्ती, आत्मविश्वास व शिस्त याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. खेळांमुळे व्यक्तिमत्त्व विकास कसा घडतो, याविषयी त्यांनी आपल्या अनुभवांच्या माध्यमातून प्रेरणादायी विचार मांडले.
या गौरव समारंभाच्या यशस्वी आयोजनासाठी राणी लक्ष्मीबाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने मोलाचे सहकार्य व परिश्रम घेतले. या विद्यार्थ्यांच्या यशामुळे ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाची क्रीडा परंपरा अधिक भक्कम होत असून, इतर विद्यार्थ्यांसाठी हा गौरव प्रेरणादायी ठरत आहे.

