डॉ.बापुराव ठाकरे यांना राज्यस्तरीय दर्पण रत्न पुरस्कार 2026 जाहीर.
![]()
डॉ.बापुराव ठाकरे यांना राज्यस्तरीय दर्पण रत्न पुरस्कार 2026 जाहीर.
मलकापूर प्रतिनिधी –
महाराष्ट्रातील अग्रगण्य दर्पण वृत्तपत्र( आंतरराष्ट्रीय नामांकन प्राप्त) हिंदी, मराठी पत्रकार संघ, यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनानिमित्त राज्यस्तरीय दर्पण रत्न पुरस्कार 2026 डॉ. बापूराव आनंदराव पाटील (ठाकरे सर) रा.मंगरूळ ता.चोपडा.जि.जळगांव.आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना वाईस ऑफ मीडिया राज्य मीडिया प्रभारी व महाराष्ट्र राज्य कोअर टीम सदस्य,उपशिक्षक साने गुरुजी विद्यामंदिर अमळनेर.अध्यक्ष शिवरथ प्रतिष्ठान, अमळनेर जिल्हा जळगाव, जिल्हाध्यक्ष जळगाव मराठी साहित्य मंडळ ठाणे, सचिव मराठा सेवा संघ शाखा अमळनेर , तालुकाध्यक्ष महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद जळगांव, खान्देश समन्वयक वधू- वर सूचक केंद्र मराठा सेवा संघ धुळे, जळगांव यांना पत्रकार दिनानिमित्त पत्रकार क्षेत्रात केलेल्या कामगिरी बद्दल दि. 06 जानेवारी 2026 रोजी मलकापूर, बुलढाणा येथे समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.त्या बदल त्यांचे अमळनेर, जळगांव येथील शिक्षक संघटना,पत्रकार संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांच्या कडून अभिनंदन होत आहे.

