मंगळग्रह सेवा संस्थेचा समाजोपयोगी उपक्रम — मोतीबिंदू रुग्णांना नवदृष्टीचा आशिर्वाद*
1 min read

मंगळग्रह सेवा संस्थेचा समाजोपयोगी उपक्रम — मोतीबिंदू रुग्णांना नवदृष्टीचा आशिर्वाद*

Loading

*मंगळग्रह सेवा संस्थेचा समाजोपयोगी उपक्रम — मोतीबिंदू रुग्णांना नवदृष्टीचा आशिर्वाद*

*अमळनेर* : धार्मिकतेसोबत सामाजिक बांधिलकी जपत येथील श्री मंगळग्रह सेवा संस्था यांच्या पुढाकाराने आणि ना. गुलाबरावजी पाटील सोशल फाउंडेशन, पाळधी, संकल्प सेवा फाउंडेशन, धनवाडी तसेच आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल यांच्या सहकार्याने रविवारी (दि.२१) डिसेंबर रोजी मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात अमळनेर, धुळे, चोपडा, जळगाव, एरंडोलसह तालुक्यातील ग्रामीण भागातून तब्बल २१० रुग्णांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी ९५ रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले असून, त्याच दिवशी दुपारी मंगळग्रह मंदिर येथून आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले
शिबिराचे उद्घाटन सकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. रुग्णांची तपासणी डॉ. राहुल चौधरी आणि डॉ. गौरव तायडे, डॉ विजय बामणे (नेत्ररोग तज्ज्ञ, शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल) यांनी केली.
कॅम्पचे मुख्य संयोजक असद अन्वर, हर्षाली शिंदे, प्राजक्ता गायकवाड सागर पाटील, रोहन कोळी यांनी शिबिराच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस एन पाटील, खजिनदार गिरीश कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी आर. जी चव्हाण उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचाल न शरद कुलकर्णी यांनी केले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी, भूषण पाटील, मयूर चौधरी, गणेश शिंपी प्रमोद, पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *