डिजिटल शिक्षणाचा प्रभावी आविष्कार; झांबरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी साकारली वैज्ञानिक मॉडेल्स
![]()
झांबरे विद्यालयात आयसीटीच्या माध्यमातून संगणक प्रदर्शन
महाराष्ट्र राज्यात समग्र शिक्षा उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेत संगणक शिक्षणासाठी प्रयोगशाळा तसेच प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आजच्या डिजिटल युगात टिकून राहण्यासाठी संगणकाशी मैत्री साधणे व त्याचे ज्ञान आत्मसात करणे अत्यंत गरजेचे आहे. हाच उद्देश ठेवून महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली आयसीटी (ICT) उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात सुसज्ज संगणक प्रयोगशाळा तयार करण्यात आली असून, या प्रयोगशाळेत इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण दिले जाते.
आयसीटी शिक्षिका स्मिता शेंडगे यांनी नुकतेच इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकडून विविध वैज्ञानिक व इलेक्ट्रॉनिक मॉडेल्स तयार करून घेतली. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी फायर सेन्सर डिटेक्टर, हेलिकॉप्टर, वॉशिंग मशीन, ड्रोन, सोलर हाऊस, सोलर कुलर, सोलर सिस्टिम, विंड टर्बाईन, बजर गेम, पवनचक्की, स्ट्रीट लाईट, वॉटर कुलर, रोबोट, स्मोकिंग मशीन, वॉटर सेन्सर, वॉटर क्लिनिंग मशीन, रिमोट कंट्रोल कार, इलेक्ट्रॉनिक सोलर सिस्टिम, व्हॅक्युम क्लिनर, रेन डिटेक्टर, वॉटर प्युरिफिकेशन, अर्थ वॅट डिटेक्टर, वेस्ट मॅनेजमेंट, फायर अलार्म आदी मॉडेल्स सादर केली.
या प्रदर्शनात
प्रथम क्रमांक – सार्थक पाटील व नरेंद्र सोनवणे
द्वितीय क्रमांक – प्रथमेश साठे
तृतीय क्रमांक – गौरव चौधरी
उत्तेजनार्थ – मनाली पाटील
तर सहभागी विद्यार्थ्यांमध्ये धनवी शिंपी, जिग्नेश्वर पाटील, आलिया तडवी, निधी सावधेकर, देवयानी सूर्यवंशी, रोहिणी पाटील, भाग्यश्री शिरसाट, ज्ञान पाटील, सना तडवी, गार्गी पवार, सायली वाघेरे, ऋषिकेश सूर्यवंशी, स्वरा कुलकर्णी, हरीश काळे, परीस ओगले, क्रिश पाटील, सार्थक सोनवणे, प्राप्ती वाघमारे, यश वाघे, स्वरा पाटील, राज कोल्हे, नैतिक कुलकर्णी, आरुषी सराडे, ज्ञानेश्वर कोळी, खुशी पाटील, शिवम सूर्यवंशी, सोहम पाटील, अनन्य जगताप, गौरव पाटील यांचा समावेश होता.
या सर्व विद्यार्थ्यांना आयसीटी प्रशिक्षक स्मिता शेंडगे यांनी मार्गदर्शन केल.

