बोर्ड परीक्षेच्या पार्श्वभूमीवर साने गुरुजी विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी कार्यशाळा
1 min read

बोर्ड परीक्षेच्या पार्श्वभूमीवर साने गुरुजी विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी कार्यशाळा

Loading

 

 

 

 

 

 

 

बोर्ड परीक्षेच्या पार्श्वभूमीवर साने गुरुजी विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी कार्यशाळा

अमळनेर प्रतिनिधी– येथील साने गुरुजी विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाच्या परीक्षेसाठी इंग्रजी विषयाची कार्यशाळा घेण्यात आली.. विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे इंग्रजी शिक्षक शरद बी पाटील यांनी बारा ते तीन या वेळेत तीन तास विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यशाळेची सुरुवात माजी आमदार व संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय गुलाबराव पाटील व साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख अतिथीच्या हस्ते करून झाली.बोर्ड परीक्षेसाठी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शरद पाटील यांनी सोप्या भाषेत ऍक्टिव्हिटी शीट समजून दिली.. इंग्रजी व्याकरण, रायटिंग स्किल इत्यादी बाबींवर सखोल असं मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांनी देखील उत्तम प्रतिसाद देऊन समाधान व्यक्त केले.. इयत्ता दहावीच्या अ ब क ड या चार तुकड्या मिळून जवळपास 200 विद्यार्थी या कार्यशाळेस उपस्थित होते. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य सुनील पाटील, शिक्षक प्रतिनिधी श्री विलास चौधरी, इंग्रजी शिक्षिका विद्या पाटील, इंग्रजी शिक्षक समाधान पाटील, गणित शिक्षक डी ए धनगर,देवेंद्र महाजन, श्री बागल आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन समाधान पाटील यांनी केले तर आभार देवेंद्र महाजन यांनी मानले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *