इ. १२ वी इंग्रजी विषयासाठी सुवर्णसंधी PTA महाराष्ट्रचा निःशुल्क ऑनलाईन उपक्रम   अवघ्या दोन तासांत संपूर्ण परीक्षाभिमुख उजळणी
1 min read

इ. १२ वी इंग्रजी विषयासाठी सुवर्णसंधी PTA महाराष्ट्रचा निःशुल्क ऑनलाईन उपक्रम अवघ्या दोन तासांत संपूर्ण परीक्षाभिमुख उजळणी

Loading

इ. १२ वी इंग्रजी विषयासाठी सुवर्णसंधी
PTA महाराष्ट्रचा निःशुल्क ऑनलाईन उपक्रम

अवघ्या दोन तासांत संपूर्ण परीक्षाभिमुख उजळणी

अमळनेर प्रतिनिधी 
इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयातील परीक्षाभिमुख तयारी अधिक सक्षम व्हावी, या उद्देशाने प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन (PTA), महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने “परीक्षेला जाता जाता…” या शीर्षकाखाली यशवंत PTA निःशुल्क इंग्रजी उजळणी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम पूर्णतः मोफत असून परीक्षेच्या अंतिम टप्प्यात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
हा कार्यक्रम शनिवार, दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ऑनलाईन (YouTube Live Lecture) माध्यमातून आयोजित करण्यात आला आहे. अवघ्या दोन तासांत इंग्रजी विषयाची संपूर्ण, नेमकी व परीक्षाभिमुख उजळणी करून देण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मोठी मदत होणार आहे.
या निःशुल्क व्याख्यानासाठी श्रीनिवास इंग्लिश अकॅडमी, जळगाव येथील सुप्रसिद्ध इंग्रजी विषयतज्ज्ञ श्री. व्यंकटेश राजन अय्यंगार (अय्यंगार सर) हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
या प्रसंगी PTA महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष श्री. प्रशांत कासार सर, महासचिव श्री. मोहन गावडे सर, जळगाव PTA चे अध्यक्ष श्री. सुरेश राजपूत सर, उपाध्यक्ष श्री. हर्षल ठाकूर सर, तसेच PTA राज्य कोअर टीम व विविध क्लास संचालक प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
राज्यातील जास्तीत जास्त इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन PTA महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी
भैय्यासाहेब मगर सर मोबा. ९४२३९०४४८३ यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *