विस्ताराचे सूत्र” ठरले आकर्षण; सावित्रीबाई फुले विद्यालयाची चमकदार कामगिरी
1 min read

विस्ताराचे सूत्र” ठरले आकर्षण; सावित्रीबाई फुले विद्यालयाची चमकदार कामगिरी

Loading

“विस्ताराचे सूत्र” ठरले आकर्षण; सावित्रीबाई फुले विद्यालयाची चमकदार कामगिरी

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे गणितीय कौशल्य ठळक

अमळनेर | प्रतिनिधी
अमळनेर येथील शिक्षण विभाग, पंचायत समिती अमळनेर व सायरादेवी बोहरा सेंट्रल स्कूल, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या विज्ञान प्रदर्शनात सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अमळनेर येथील विद्यार्थ्यांनी आपल्या नावीन्यपूर्ण व अभ्यासपूर्ण सादरीकरणाने विशेष लक्ष वेधून घेतले.
विद्यालयातील इयत्ता ९ वीचा विद्यार्थी सौरभ पाटील व इयत्ता ७ वीचा विद्यार्थी प्रणव पाटील यांनी “विस्ताराचे सूत्र” या विषयावर आधारित गणितीय मॉडेल सादर केले. या मॉडेलच्या माध्यमातून गणितातील संकल्पना सोप्या, शास्त्रीय व प्रभावी पद्धतीने मांडण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या या प्रयोगशीलतेचे व सादरीकरण कौशल्याचे परीक्षक व उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
या विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक श्री. गौरव पाटील व श्री. हर्षल कुमार बेहरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल प्राचार्य श्री. पी. एम. कोळी यांनी समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे तसेच या उपक्रमासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे अभिनंदन केले.
विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशामुळे सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा व विज्ञानाभिमुख उपक्रमांचा पुन्हा एकदा गौरव झाला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *