भारतीय शिल्पकलेचा तेजस्वी दीप विझला  ,जलरंग पोर्ट्रेटद्वारे कलाशिक्षक यश महाजन यांची राम सुतार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
1 min read

भारतीय शिल्पकलेचा तेजस्वी दीप विझला ,जलरंग पोर्ट्रेटद्वारे कलाशिक्षक यश महाजन यांची राम सुतार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Loading

भारतीय शिल्पकलेचा तेजस्वी दीप विझला

जलरंग पोर्ट्रेटद्वारे कलाशिक्षक यश महाजन यांची राम सुतार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

अमळनेर प्रतिनिधी :
जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ शिल्पकार, महाराष्ट्र भूषण तथा पद्मविभूषण स्वर्गीय रामजी (राम) सुतार यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण कला विश्वावर शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर कळमसरे (ता. अमळनेर) येथील व वाणी विद्या शाळा, कल्याण (प.) येथील कलाशिक्षक यश महाजन यांनी आपल्या जलरंग माध्यमातील पोर्ट्रेट चित्र साकारून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

गोंदूर (जि. धुळे) या छोट्या गावातून जागतिक स्तरापर्यंत झेप घेणाऱ्या राम सुतार यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महापुरुषांच्या भव्य शिल्पांद्वारे भारतीय शिल्पकलेला नवी ओळख दिली. त्यांच्या निधनाने कला, संस्कृती व राष्ट्रासाठी अपूरणीय हानी झाली असून त्यांची कला व प्रेरणा सदैव अजरामर राहील, अशा शब्दांत यश महाजन यांनी श्रद्धांजली व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *