त्र्यंबकेश्वरमध्ये सेवाभावाचे दर्शन : डिवायएसपी देसले साहेबांचा संवेदनशील पुढाकार
1 min read

त्र्यंबकेश्वरमध्ये सेवाभावाचे दर्शन : डिवायएसपी देसले साहेबांचा संवेदनशील पुढाकार

Loading

त्र्यंबकेश्वरमध्ये सेवाभावाचे दर्शन : डिवायएसपी देसले साहेबांचा संवेदनशील पुढाकार

अमळनेर प्रतिनिधी 
नाशिक ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) मा. वासुदेव देसले साहेब यांनी आपल्या संवेदनशील, कर्तव्यदक्ष आणि सामाजिक बांधिलकीच्या कार्यातून पुन्हा एकदा मानवतेचा आदर्श घालून दिला आहे.
अमळनेर तालुक्यातील जी. एस. हायस्कूल, अमळनेर येथील शिक्षक, चालक व तब्बल ९० विद्यार्थ्यांचा शैक्षणिक सहल गट त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी गेलेला असताना, देसले साहेबांनी स्वतः पुढाकार घेत सर्वांशी आपुलकीने हितगुज केले. विद्यार्थ्यांना व शिक्षकांना नाश्ता व पाणी देत, त्र्यंबकेश्वर देवाचे दर्शन तात्काळ व सुलभ पद्धतीने होईल, यासाठी त्यांनी मोलाचे सहकार्य केले. आपल्या व्यस्त शासकीय वेळेतूनही त्यांनी दिलेला हा अमूल्य वेळ उपस्थित सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.
यावेळी देसले साहेबांसोबत भानुदास बोरसे (सोनखेडीकर) साहेबांनीही सहकार्य करत विद्यार्थ्यांचे दर्शन लवकरात लवकर व्हावे यासाठी विशेष प्रयत्न केले. या प्रेमळ व तत्पर सहकार्याबद्दल जी.एस. हायस्कूलचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी देसले साहेबांचे मनःपूर्वक आभार मानले.
मा. वासुदेव देसले साहेब हे केवळ एक कर्तव्यदक्ष अधिकारी नसून, अमळनेर तालुक्यातील नागरिकांच्या अडचणींसाठी सदैव धावून येणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. तालुक्यातील कोणाचाही प्रश्न असो, तो सोडवण्यासाठी देसले साहेब नेहमीच सहकार्याची भूमिका घेतात.
यापूर्वीही अमळनेर संत गजानन महाराज परिवारातील पंधरा महिला भगिनी त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी गेल्या असता त्यांना दर्शन मिळाले नव्हते. त्या वेळी महिलांनी पत्रकार ईश्वर महाजन यांच्याशी संपर्क साधला. महाजन यांनी तात्काळ DySP वासुदेव देसले साहेबांशी संपर्क साधून सर्व महिलांसाठी दर्शनाची उत्तम व्यवस्था करून दिली. दर्शनानंतर देसले साहेब व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य तसेच लोकनियुक्त सरपंच सौ. सुषमाताई देसले यांनी सर्व महिलांना प्रेमाने चहा, पाणी व जेवण देऊन सन्मानपूर्वक रवाना केले होते.
या सर्व घटनांतून देसले परिवार हा सामाजिक बांधिलकी जपणारा, मानवतावादी व सेवाभावी कुटुंब असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्यांच्या या कार्यामुळे समाजात प्रशासनाविषयी विश्वास आणि आपुलकी अधिक दृढ होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *