अखिल भारतीय मराठा महासंघ सातारा जिल्हा आयोजित बैठकीत जिल्ह्यात नवनियुक्त पदाधिकारी यांच्या निवडी जाहीर*
![]()
*अखिल भारतीय मराठा महासंघ सातारा जिल्हा आयोजित बैठकीत जिल्ह्यात नवनियुक्त पदाधिकारी यांच्या निवडी जाहीर*
सातारा/ अखिल भारतीय मराठा महासंघ सातारा जिल्हा आयोजित बैठक दि/१६/१२/२०२५ रोजी सातारा येथील विश्राम गृह येथे मोठ्या संख्येने आणि उत्साहात पार पडली या वेळी सातारा जिल्हा (उत्तर)अध्यक्ष श्री दत्तात्रय पाटील, सातारा जिल्हा (दक्षिण)अध्यक्ष श्री अनिल (बापू)घराळ यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली पार पडली या वेळी उत्तर सातारा आणि दक्षिण सातारा विभागातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या वेळी जिल्हा चिटणीस श्री जितेंद्र भोसले यांनी मराठा महासंघांच्या कार्या विषयावर माहिती आणि सखोल असे मार्गदर्शन केले. सातारा दक्षिण महिला अध्यक्षा सौ.वैशाली जाधव कराड यांनी ही आपल्या भाषणात जास्ती जास्त महिलांनी सहभागी होऊन मराठा समाजा साठी एकत्र येऊन काम केले पाहिजे असे ही या वेळी आपल्या भाषणात बोलत होत्या त्यांनी आपल्या केलेल्या कार्याचा अनुभव सांगून बहू मोलाचे योगदान सहकार्य आणि मार्गदर्शन पदाधिकारी यांच्या समोर मांडले या नंतर काही तालुक्यातील पदांसाठी फेरबदल करण्यात आला या मध्ये सातारा जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री बजरंग वांगडे जावली ता अध्यक्ष म्हणून श्री सुनील धनावडे तर जावली उपाध्यक्ष श्री संतोष महामुलकर जावली ता कार्याध्यक्ष श्री हणूमंत शिंदे जावली तालुका महीला अध्यक्षा सौ.शिल्पा गोळे जावली ता.महिला उपाध्यक्षा सौ.लक्ष्मी चिकणे सातारा जिल्हा संयुक्त चिटणीस श्री संदीप माने खंडाळा तालुका अध्यक्ष श्री प्रविण विर सातारा तालुका अध्यक्ष श्री अमोल जाधव महाबळेश्वर तालूका अध्यक्ष श्री विजयकुमार भिलारे कोरेगाव तालुका अध्यक्ष श्री तेजेश घोरपडे सातारा तालुका सदस्य रमेश वाघमळे आणि इतर नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित केले आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. या वेळी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी सभासद सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते .मराठी लाईव्ह न्युज सातारा अनिल करंदकर

