जळगाव जिल्ह्यातील ४ वाळूगटांसाठी ई-निविदा व ई-लिलावास मुदतवाढ*
1 min read

जळगाव जिल्ह्यातील ४ वाळूगटांसाठी ई-निविदा व ई-लिलावास मुदतवाढ*

Loading

*जळगाव जिल्ह्यातील ४ वाळूगटांसाठी ई-निविदा व ई-लिलावास मुदतवाढ*

जळगाव, दि. १६ डिसेंबर – जळगाव जिल्ह्यातील वाळू/रेती निर्गतीसाठी सन २०२५–२०२६ या वर्षाकरिता ई-निविदा (e-Tendering) व ई-लिलाव (e-Auction) प्रक्रिया राबविण्यात येत आहे. खाणकाम आराखडा मंजूर, पर्यावरणसंबंधी जनसुनावणी पूर्ण व पर्यावरण अनुमती प्राप्त असलेल्या वाळूगटांसाठी ०१ डिसेंबर २०२५ रोजी ०७ वाळूगटांची ई-निविदा व ई-लिलाव प्रक्रिया जाहीर करण्यात आली होती. याबाबतची सविस्तर माहिती https://mahatenders.gov.in तसेच https://jalgaon.nic.in या संकेतस्थळांवर आणि जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालये व तहसील कार्यालयांच्या सूचना फलकांवर प्रसिद्ध करण्यात आली होती.

तथापि, ०१ ते १५ डिसेंबर २०२५ या कालावधीत एकूण ०७ पैकी केवळ ०३ वाळूगटांसाठी प्रतिसाद मिळाला असून उर्वरित ०४ वाळूगटांसाठी प्रतिसाद प्राप्त झालेला नाही. प्रतिसाद न मिळालेल्या दोनगाव खु. (ता. धरणगाव), दोदंवाडे (ता. चोपडा), टाकरखेडा (ता. जामनेर) व चोरगाव (ता. धरणगाव) या ०४ वाळूगटांसाठी इच्छुक व्यक्ती/संस्था/संस्थांना ई-निविदा व ई-लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रथम मुदतवाढ देण्यात आली आहे.

मुदतवाढीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे—
१६ डिसेंबर २०२५ पासून ऑनलाईन नोंदणीस प्रारंभ होऊन २२ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंदणी सुरू राहील. याच कालावधीत ई-निविदा व ई-लिलावात भाग घेणाऱ्या व्यक्ती संस्था यांनी वाळू, रेती गटाच्या २५ टक्के इतकी इसारा रक्कम (EMD) ऑनलाईन जमा करणे आवश्यक आहे. निविदा ऑनलाईन पद्धतीने २२ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्वीकारल्या जातील. २३ ते २४ डिसेंबर २०२५ दरम्यान तांत्रिक लिफाफ्यांची छाननी करण्यात येईल, तर २६ डिसेंबर २०२५ रोजी आर्थिक लिफाफे उघडण्यात येणार आहेत. ई-लिलावाची प्रक्रिया २९ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे.

ई-निविदा प्रक्रियेसाठी कंत्राटदारांनी https://www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर विहित मुदतीत ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. कोणतेही कारण नमूद न करता निविदा प्रक्रिया रद्द करणे, वेळापत्रकात बदल करणे किंवा अटी व शर्तींमध्ये सुधारणा करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना राहतील. वाळू धोरण-२०२५ तसेच पर्यावरण अनुमतीतील सर्व अटी व शर्ती आणि गौणखनिज विषयक शासन निर्णयांचे पालन करणे निविदाधारकास बंधनकारक राहील.

ई-निविदा व ई-लिलाव प्रक्रियेत अडचण आल्यास २४x७ तांत्रिक सहाय्यासाठी टोल फ्री क्रमांक ०१२०-४४९३३९५, ०१२०-४००१००२ किंवा ०१२०-४००१००५ वर संपर्क साधावा अथवा support.eproc@nic.in या ई-मेलवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी प्रसिद्धी पत्रकांनव्ये केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *