संघर्षातून यशाकडे : आदरणीय बापूसाहेब संग्रामसिंह राजपूत यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास
![]()
संघर्षातून यशाकडे : आदरणीय बापूसाहेब संग्रामसिंह राजपूत यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास
अमळनेर प्रतिनिधी
शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील संघर्षातून घडलेले
प्रेरणादायी, अभ्यासू आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व
आदरणीय बापूसाहेब संग्रामसिंह राजपूत यांना
🎉🎂 ६१ व्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🎂🎉
जीवनाच्या प्रवासात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत, शिक्षणाची ज्योत अखंड तेवत ठेवून आपण एम.ए. व एम.लिब. सायन्स या पदव्या संपादन केल्या. आपल्या जिद्द, चिकाटी व परिश्रमांच्या बळावर नंदुरबार येथील जिजामाता शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथपाल तसेच प्राध्यापक पदावर आपण प्रामाणिक व आदर्श सेवा बजावली.
आपल्या कुटुंबातील प्रत्येक यशामागेही आपले संस्कार व मार्गदर्शन ठळकपणे दिसून येते. मोठ्या कन्येला एम.एस्सी. अॅग्री व एम.बी.ए. शिक्षण देऊन तिचा सुसंस्कारित विवाह केला; आज ती पुण्यातील नामांकित कंपनीत कार्यरत आहे. जावईसुद्धा अभियंता असून उत्तम पदावर कार्यरत आहेत. लहान कन्या नाशिक येथील संदीप विद्यापीठात बी.टेक (कॉम्प्युटर सायन्स) अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून तीही उज्ज्वल भवितव्याकडे वाटचाल करत आहे.
शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत, नंदुरबार येथील कॉलनीमध्ये महादेवाचे भव्य मंदिर उभारून आपण धार्मिक व सांस्कृतिक ऐक्य जपले. त्या कॉलनीचे अध्यक्ष म्हणून कार्य करताना समाजात आपली राजकीय व सामाजिकदृष्ट्या सन्माननीय व विश्वासार्ह प्रतिमा निर्माण केली आहे.
राष्ट्रीय हित, समाजहित, सुसंस्कारित कुटुंबव्यवस्था आणि सशक्त पिढी घडावी या उद्देशाने दिलेली आपली विचारप्रवर्तक व्याख्याने आजही अनेकांच्या जीवनाला दिशा देत आहेत. समाजाच्या सुख-दुःखात सहभागी होत आपण अखंडपणे विचारांची सेवा करत आहात.
आई तुळजाभवानी मातेच्या कृपेने आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, मानसिक समाधान व अखंड यश लाभो, हीच प्रार्थना. आपल्या अनुभवांचा, विचारांचा व कार्याचा प्रकाश समाजाला अजून दीर्घकाळ लाभो, हीच सदिच्छा.
💐🎂🌸
शुभेच्छुक
— ईश्वर आर.महाजन
पत्रकार, अमळनेर
9860352960

