शिरसोलीत विज्ञानाची रंगत! तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जागर—ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन, १४० हून अधिक सहभागी विद्यार्थी-शिक्षकांचे सादरीकरण
![]()
शिरसोलीत विज्ञानाची रंगत! तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जागर—ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन, १४० हून अधिक सहभागी विद्यार्थी-शिक्षकांचे सादरीकरण
जळगांव प्रतिनिधी
शिक्षण विभाग पंचायत समिती जळगाव व सौ.हिराबाई जगतराव पाटील माध्यमिक विद्यालय शिरसोली प्र. बो. यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 15/12/2025 वार सोमवार रोजी जळगाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. *कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक मान.नामदार गुलाबरावजी पाटील (पाणीपुरवठा व स्वच्छता कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री जळगाव) हे होते* . तर *प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री चंद्रकांत बोढरे (गटविकास अधिकारी पंचायत समिती जळगाव) श्रीमती सरला सरला पाटील (सहाय्यक गटविकास अधिकारी प. स. जळगाव) मा श्री. अजित तडवी साहेब (गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती जळगाव ) मा श्री. विजय पवार साहेब (गटशिक्षण अधिकारी प.स पाचोरा)मा.श्री जितेंद्र चिंचोले साहेब (शिक्षण विस्तार अधिकारी प.स.जळगाव) मा. अप्पासो.जगतराव बारकू पाटील (अध्यक्ष, जिजामाता विद्या प्रसारक मंडळ ) मा.श्री.प्रमोद जगतराव पाटील (चेअरमन,शालेय समिती ) मा.श्री. शांताराम कुमार साहेब (शिक्षण विस्ताराधिकारी शिरसोली बीट) हे होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.कल्पना प्रमोद पाटील ह्या होत्या*
सदर विज्ञान प्रदर्शन प्राथमिक गटात 85 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तर माध्यमिक गटात 53 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला व शैक्षणिक साहित्य निर्मिती गटात ८ शिक्षकांनी सहभाग नोंदविला दिव्यांग एक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला .
अध्यक्षीय भाषणात *मा. ना.गुलाबरावजी पाटील* यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे प्रत्येक गोष्ट तर्क पुरावा आणि निरीक्षणाच्या आधारे समजून घेण्याची सवय होय. अंधश्रद्धा गैरसमज दूर करून सत्याचा शोध घेणे ही वैज्ञानिक दृष्टिकोनाची मुख्य भूमिका आहे असे स्पष्ट मत मांडले.
*कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापिका सौ.कल्पना प्रमोद पाटील यांनी केले* . विज्ञान प्रदर्शनाचे बक्षीस वितरण प्रसंगी *मा श्री पठाण साहेब (उपशिक्षणाधिकारी जि. प.जळगाव)श्रीमती हवेली मॅडम (प्राथमिक उपशिक्षणाधिकारी जि प जळगाव) यांच्या हस्ते करण्यात आले*
बक्षीस वितरणात *प्राथमिक गटात* १) मिनल बाळू सोनवणे *प्रथम* (आर्. एन. लाठी माध्यमिक विद्यालय भोकर)
२) सोनाली संजय पाटील *द्वितीय* सौ हिराबाई जगतराव पाटील माध्यमिक विद्यालय शिरसोली
३) सायली अजय बारी *तृतीय* (जिजामाता माध्यमिक विद्यालय जळगाव)
*माध्यमिक गटात*
१) मृदुल नितीन पाटील *प्रथम* (न्यू इंग्लिश स्कूल नशिराबाद)
२) पार्थ दीपक चौधरी *द्वितीय* (प्रगती माध्यमिक विद्यालय जळगाव)
३) अरसलम असलम पठाण *तृतीय* (स्व. सैन. प.सं. थेपडे माध्यमिक विद्यालय मसावद
*दिव्यांग गटात*
१) भार्गव रवींद्र पाटील *प्रथम*
*आदिवासी शाळा गटात*
१) अंकिता गणेश राठोड *प्रथम* (जिल्हा परिषद शाळा सुभाष वाडी) यांनी पारितोषिके पटकावले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुशील पवार सर (केंद्रप्रमुख कानळदा बीट) यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री गोपाल महाजन सर (सार्वजनिक विद्यालय असोदा )यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ. हिराबाई जगतराव पाटील माध्यमिक विद्यालय येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

