खानदेश शिक्षण मंडळ संचालकपदासाठी प्रवीण रामलाल जैन यांची उमेदवारी जाहीर
![]()
खानदेश शिक्षण मंडळ संचालकपदासाठी प्रवीण रामलाल जैन यांची उमेदवारी जाहीर
प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे उद्या सकाळी 11.30 वाजता समर्थक व हितचिंतकांची उपस्थिती आवाहन
अमळनेर प्रतिनिधी
खानदेश शिक्षण मंडळाच्या संचालक पदासाठी अमळनेर येथील शिक्षणप्रेमी व सामाजिक कार्यात सक्रिय असलेले प्रवीण रामलाल जैन यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, पारदर्शक कार्यपद्धती व संस्थेच्या सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन लक्षात घेता त्यांच्या उमेदवारीकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात आहे.
या निमित्ताने उद्या सकाळी 11.30 वाजता प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे सर्व मित्रपरिवार, हितचिंतक व शिक्षणप्रेमी नागरिकांसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या उपस्थितीने प्रवीण जैन यांच्या उमेदवारीला बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
प्रवीण रामलाल जैन हे यापूर्वी खानदेश शिक्षण मंडळाचे माजी संचालक राहिले असून सध्या ते अमळनेर अर्बन बँकेचे विद्यमान संचालक आहेत. शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील त्यांचे योगदान सर्वपरिचित आहे.
या कार्यक्रमास उपस्थित राहून प्रवीण जैन यांच्या उमेदवारीस समर्थन देण्याचे आवाहन प्रवीण जैन मित्रपरिवार व सर्व हितचिंतक व देसरडा परिवार, अमळनेर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

