शिक्षकांच्या न्यायासाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सर्वपक्षीय शिक्षक आमदारांचे धरणे आंदोलन   ,✊जुनी पेन्शन, टीईटी सूट, अनुदान व सेवा-सुरक्षेसाठी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात ठाम लढा
1 min read

शिक्षकांच्या न्यायासाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सर्वपक्षीय शिक्षक आमदारांचे धरणे आंदोलन ,✊जुनी पेन्शन, टीईटी सूट, अनुदान व सेवा-सुरक्षेसाठी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात ठाम लढा

Loading

🛑 शिक्षकांच्या न्यायासाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सर्वपक्षीय शिक्षक आमदारांचे धरणे आंदोलन

जुनी पेन्शन, टीईटी सूट, अनुदान व सेवा-सुरक्षेसाठी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात ठाम लढा

 

नागपूर प्रतिनिधी

राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याकरिता राज्यातील सर्वपक्षीय शिक्षक आमदारांनी नागपूर येथे विधान भवनाच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलन केले
राज्यात शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत त्यातील प्रामुख्याने 01 नोव्हेंबर 2005 पूर्वी* *विनाअनुदान व अंशतः* *अनुदानावा वर नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी*,
*टी.इ.टी पात्रता परीक्षा लागू नव्हती तेव्हा सेवेत असलेल्या शिक्षकांना टीईटी तून सूट द्यावी, 10 मार्च 2024 च्या संच मान्यतेचा जाचक अटीचा निर्णय रद्द करावा, 30 दिवसात त्रुटी पूर्तता केला शाळांना अनुदान द्यावे, शेवटच्या वर्गाची पटसंख्या, रोस्टर पूर्ण केलेल्या शाळांना व मूल्यांकनास पात्र ठरणाऱ्या सर्व शाळा तुकड्या व कनिष्ठ महाविद्यालयास अनुदान द्यावे, वरिष्ठ महाविद्यालयाचा कायम शब्द वगळून अनुदान द्यावे , अर्धवेळ शिक्षकांचे वंदन करावे, अशैक्षणिक कामातुन शिक्षकांच्या मुक्तता करावी, आश्वासित प्रगती योजना लागू करावी, आश्रमशाळा शिक्षकांच्या विविध अशा विविध मागण्याकरिता राज्यातील सर्वच शिक्षक आमदारांनी आज नागपूर येथे हिवाळी अधिवेशन मध्ये विधान भवनाच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलन करत शासनाकडे शिक्षक व शिक्षकेतरांच्या समस्या मांडल्या यामध्ये आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर, आमदार विक्रम काळे,आमदार ज. मो. अभ्यंकर, आमदार किशोर दराडे, आमदार किरण सरनाईक, आमदार जयंत आसगावकर उपस्थित राहून शासनाचे लक्ष वेधत धरणे आंदोलन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *