गार्गीची बुद्धिमत्ता चमकली! इंग्रजीत 99 गुणांनी शाळेत अव्वल
![]()
गार्गीची बुद्धिमत्ता चमकली! इंग्रजीत 99 गुणांनी शाळेत अव्वल
अमळनेर प्रतिनिधी
डी. आर. कन्या हायस्कूल, अमळनेर येथील कु. गार्गी सुनिल जोशी हिने इयत्ता दहावीच्या सहामाही परीक्षेत अपूर्व यश संपादन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. इंग्रजी विषयात तिने 100 पैकी 99 गुण मिळवत केवळ उत्तुंग गुणवत्ता सिद्ध केली नाही, तर संपूर्ण शाळेत प्रथम क्रमांकही पटकावला!
गार्गीच्या या उल्लेखनीय यशामागे तिची नियमित अभ्यासाची सवय, प्रामाणिकपणा, चिकाटी आणि योग्य दिशेने केलेली तयारी हे मुख्य घटक ठरले. अभ्यासात सातत्य ठेवले की यश नक्की मिळते, याची प्रखर जाणीव गार्गीने आपल्या यशातून पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
गार्गीच्या या प्रेरणादायी यशाबद्दल साई इंग्लिश अकॅडमीचे संचालक भैय्यासाहेब मगर यांनी तिचा यथोचित सत्कार व गौरव केला तसेच तिच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छाही दिल्या.

