उपविधींच्या संविधानानुसार पारदर्शक वाटचालीनेच सहकार समृध्द होईल- आर.एस.बोडखे*  *मानवधर्म नागरी सहकारी पतसंस्थेचे सहकार प्रशिक्षण संपन्न*
1 min read

उपविधींच्या संविधानानुसार पारदर्शक वाटचालीनेच सहकार समृध्द होईल- आर.एस.बोडखे* *मानवधर्म नागरी सहकारी पतसंस्थेचे सहकार प्रशिक्षण संपन्न*

Loading

*उपविधींच्या संविधानानुसार पारदर्शक वाटचालीनेच सहकार समृध्द होईल- आर.एस.बोडखे*

*मानवधर्म नागरी सहकारी पतसंस्थेचे सहकार प्रशिक्षण संपन्न*

*अकोला* -महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात २२ हजार सहकारी नोंदणीकृत संस्था आहेत.परंतू त्यापैकी त्यापैकी १२ फक्त हजारच अस्तित्वात आहेत‌.ह्या बुडालेल्या संस्था म्हणजे सहकाराचे संविधानातील उपविधींचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांच्या वास्तव जाणींवाकडे संचालकांकडून झालेली सहकारधर्माविरूध्द झालेली वाटचाल आहे.या क्षेत्रातील सहकार संचालकांनी ठेवी,गुंवणूका आणि कर्जवितरण प्रक्रियेतील दक्षता समजून घेऊन त्यानुसार काटेकोर वाटचाल करावी.स्थानिक मानवधर्म नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाचे त्यानुसार सुरू असलेले कार्य ही सहकारातील आदर्श वाटचाल आहे.असे प्रतिपादन अकोला-वाशिम जिल्हा सहकारी बॕंकेचे माजी व्यवस्थापक आर एस.बोडखे यांनी या पतसंस्था संचालक- सेवकांच्या सहकार प्रशिक्षण कार्यशाळेत कार्यातील जबाबदाऱ्या आणि कर्तव्याचे प्रशिक्षण देतांना केले.याप्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

शासनाच्या सहकार विभागाच्या निर्देशानुसार अकोला येथील काकासाहेब दिक्षित सहकार प्रशिक्षण केन्द्राकडून आयोजित ३ दिवसीय सहकार प्रशिक्षण नुकतेच जेठारपेठेतील जैन रेस्ट्रो येथे संपन्न झाले. सहकार प्रशिक्षण केन्द्राचे सहकार विकास अधिकारी सुहास कांबे सुध्दा मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.मानवधर्म पतसंस्थेचे अध्यक्ष श्री.जानकीराम वाकोडे हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.यावेळी सर्वप्रथम रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, सामाजिक विकासातील महापुरूष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,कर्मयोगी संत गाडगे बाबा व मानवधर्म पतसंस्था संस्थापक व माजी अध्यक्ष स्व.स्वामी शांताननद सरस्वती महाराज यांना वंदन ,अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविकातून बोलतांना श्री.सुहास कांबे यांनी सुध्दा महाराष्ट्र राज्य सहकार संघाकडून सहकार प्रशिक्षणासाठी राज्यात १३ प्रशिक्षण केन्द्रे कार्यरत असून सहकारातून योग्य अशी सामाजिक उन्नती साधण्यासाठी उपविधींचे पालन हा सहकारी संस्थांना यशाच्या दालनांना उघडणारी नेऊन सोडणारी संविधानिक गुरूकुल्ली असल्याचे सांगीतले.

या प्रशिक्षण कार्यक्रमात उपाध्यक्ष दिनकर घोरड,सचिव डॉ.रणजीत देशमुख,खजिनदार भास्कर काळे, संजय एम.देशमुख,सुधीर वाकोडे,माणिकराव सरदार,देवीदास घोरळ,विजय बाहकर,सौ.शोभा तेलगोटे,सौ.जयश्री बोचरे,प्रा.विजय काटे,सुरेश तिडके,व्यवस्थापक नरेन्द्र डंबाळे,कुंदा पवार,विकी क्षिरसागर उपस्थित होते. संचलन खजिनदार भास्कर काळे यांनी तर आभारप्रदर्शन संजय देशमुख यांनी केले.
==================================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *