अमळनेर तहसील: प्रतिज्ञापत्र स्वीकारण्याची सेवा थांबली; नागरिकांना त्रास शिवसेनेच उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
![]()
अमळनेर तहसील: प्रतिज्ञापत्र स्वीकारण्याची सेवा थांबली; नागरिकांना त्रास
शिवसेनेच उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील नागरिकांना महसूल विभागातील प्रतिज्ञापत्र (Affidavit) स्वीकारण्यात अडथळा निर्माण झाल्याने कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, राहिवासी प्रमाणपत्र, नामांतरणाची प्रक्रिया, वारस नोंद अशा अनेक प्रशासनिक कामांसाठी प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक असते, मात्र काही दिवसांपासून ही सेवा थांबवण्यात आली आहे.
यामुळे शासनाच्या योजना, शालेय आणि महाविद्यालयीन प्रक्रिया, बँक व्यवहार तसेच इतर कायदेशीर कामे विलंबित होत आहेत. विद्यार्थ्यांपासून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत त्रास वाढला आहे.
अमळनेर शिवसेना तालुकाप्रमुख सुरेश पाटील यांनी उपविभागीय अधिकारी मयुरजी भंगाळे व तहसीलदार सुराणा यांना निवेदन दिले , तसेच जिल्हाधिकारी पालकमंत्र्यांनाही पत्र पाठवले आहे. निवेदनात प्रतिज्ञापत्र स्वीकारण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ववत करण्याची मागणी केली असून, नागरिकांच्या दैनंदिन कामकाजाला गती मिळावी यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना जाहीर करण्याची विनंती देखील करण्यात आली आहे.
सुरेश पाटील यांनी नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी प्रशासनाकडून सकारात्मक तोडगा काढण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
यांनी केली मागणी
शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेश पाटील,
शेतकी संघटनेचे माजी अध्यक्ष श्यामकांत पाटील ,गुलाब करीम खा ,शेख नावीद, महेश पाटील ,भूषण कोळी ,अनिल पवार, शोएब शेख, संजय कौतिक पाटील शहर प्रमुख शिवसेना , एडवोकेट योगराज कोळी, संजय पाटील, विनोद दुसाने, आबा चौधरी ,दिनेश पाटील ,किरण पाटील, उमेश पाटील, शिवसैनिक उपस्थित होते.

