ब्राह्मणवेल येथे सुवर्ण महोत्सवी फिरता नारळी कार्यक्रम . .
1 min read

ब्राह्मणवेल येथे सुवर्ण महोत्सवी फिरता नारळी कार्यक्रम . .

Loading

ब्राह्मणवेल येथे सुवर्ण महोत्सवी फिरता नारळी कार्यक्रम . .

साक्री तालुक्यातील ब्राह्मणवेल येथे संत निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर पदयात्रा निमित्ताने वारकरी संप्रदायाचा श्रीक्षेत्र जायखेडा येथून पदयात्रा निघत असते . पदयात्रेच्या संदेश देण्याकरिता दरवर्षी फिरता नारळाचा कार्यक्रम घेण्यात येतो . यावर्षी श्रीक्षेत्र ब्राह्मणवेल ता . साक्री येथे सुवर्ण महोत्सवी अर्थात पन्नासावा फिरता नारळी कार्यक्रम संपन्न होणार आहे . या कार्यक्रमास खानदेश स्तरातून ३० ते ४० हजार वारकरी एकत्र जमतील असा कयास आहे .सदर कार्यक्रमाला महाराष्ट्राचे थोर कीर्तनकार वाणीभूषण ह भ प अनिल महाराज पाटील ( बार्शीकर ) यांचे कीर्तन होणार आहे .स्वानंद सुख निवासी वैकुंठवासी गुरुवर्य जोग महाराज तसेच वैकुंठवासी गुरुवर्य मामासाहेब दांडेकर आणि महन्महनिय परमपूज्य गुरुवर्य कृष्णाजी माऊली श्रीक्षेत्र जायखेडा यांच्या असीम अशा ऊर्जेतून अन् तपस्वीतेतून व कृपाप्रसादाने निर्मित तसेच श्रद्धास्थान ह भ प सौ यशोदाजी अक्का यांच्या मार्गदर्शनाने हा फिरता नारळी कार्यक्रम होत आहे . या कार्यक्रमास परिसरातील सर्व संत मंडळी उपस्थित राहणार आहेत . तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थिती द्यावी . असे आवाहन ब्राह्मणवेल ग्रामस्थ मंडळी आणि माऊली परिवार जायखेडा यांच्या वतीने करण्यात येत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *