डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथीनिमित्त महात्मा फुले हायस्कूलमध्ये अभिवादन
1 min read

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथीनिमित्त महात्मा फुले हायस्कूलमध्ये अभिवादन

Loading

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथीनिमित्त महात्मा फुले हायस्कूलमध्ये अभिवादन

अमळनेर प्रतिनिधी
महात्मा जोतीराव फुले हायस्कूल, देवगाव (ता. अमळनेर) येथे ६ डिसेंबर रोजी भारतीय संविधान निर्माते, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम अत्यंत श्रद्धाभावाने पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यानंतर उपस्थित शिक्षक व कर्मचाऱ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस नमन केले.
या वेळी शाळेचे शिक्षक आय. आर. महाजन, एस. के. महाजन, एच. ओ. माळी तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी देवेश पाटील, संभाजी पाटील व गुरुदास पाटील उपस्थित होते. सर्वांनी मिळून बाबासाहेबांच्या कार्याचा, विचारांचा आणि सामाजिक परिवर्तनातील त्यांच्या भूमिकेचा आढावा घेतला.
मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, “आजच्या समाजजीवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाहीवादी, वैज्ञानिक आणि मानवतावादी विचारांची नितांत गरज आहे. शिक्षण, समता आणि बंधुता हे मूल्य प्रत्येक विद्यार्थ्याने अंगीकारणे हेच बाबासाहेबांना खरे अभिवादन ठरेल.”

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *