अमळनेरचा ‘मत’महोत्सव! शहर पेटलं उत्साहाने—64.48% ची विक्रमी झेप   97 केंद्रांवर सुरळीत मतदान, तीन मशीनमध्ये बिघाड तरी तत्काळ उपाय; नागरिक, पोलिस व स्वयंसेवकांनी निभावली जबाबदारी   सुशोभीत बूथ, उत्साही मतदार आणि तात्काळ व्यवस्थापनामुळे निवडणूक प्रक्रिया सुरळीत; 126 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद
1 min read

अमळनेरचा ‘मत’महोत्सव! शहर पेटलं उत्साहाने—64.48% ची विक्रमी झेप 97 केंद्रांवर सुरळीत मतदान, तीन मशीनमध्ये बिघाड तरी तत्काळ उपाय; नागरिक, पोलिस व स्वयंसेवकांनी निभावली जबाबदारी सुशोभीत बूथ, उत्साही मतदार आणि तात्काळ व्यवस्थापनामुळे निवडणूक प्रक्रिया सुरळीत; 126 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

Loading

अमळनेरचा ‘मत’महोत्सव! शहर पेटलं उत्साहाने—64.48% ची विक्रमी झेप

 

97 केंद्रांवर सुरळीत मतदान, तीन मशीनमध्ये बिघाड तरी तत्काळ उपाय; नागरिक, पोलिस व स्वयंसेवकांनी निभावली जबाबदारी

 

सुशोभीत बूथ, उत्साही मतदार आणि तात्काळ व्यवस्थापनामुळे निवडणूक प्रक्रिया सुरळीत; 126 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

मतपेट्यांत साठला अमळनेरचा निर्णय! निकालापूर्वीच शहरात चर्चेची धग

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)

अमळनेर नगरपरिषद 2025 ची निवडणूक विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील व माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या साठी प्रतिष्ठेची बनलेली होती यासाठी दोघांनी प्रचार प्रसार वेगळ्या सभा मोठ्या प्रमाणावर घेतल्या होत्या पण निवडणुकीचा निकाल लामल्यामुळे लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांची हिरमोड झाली अजून काही दिवस निकालासाठी थांबावं लागणार आहे. आता कोणत्या प्रभागामध्ये कोणता नगरसेवक निवडेल व शहराचा नगराध्यक्ष कोण याची उत्सुकता कार्यकर्ते व मतदारांमध्ये लागली आहे. पण एकंदरीत अमळनेर नगर परिषदेची निवडणूक प्रथमच एवढी प्रतिष्ठेची बनली होती.. यासाठी लक्ष्मी दर्शनही मोठ्या प्रमाणात झाले .त्यामुळे एवढे मतदान झाल्याचे बोलले जात आहे.
नगरपरिषद निवडणुकीसाठी 64.48 टक्के मतदान झाले.
अमळनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीत एकूण 89 751 मतदारापैकी 57,871 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. म्हणजे 64.48. मतदान झाले.
नगराध्यक्षपदासाठी सहा आणि 34 नगरसेवक पदांसाठी 126 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. प्रभाग 1 अ ,ची निवडणूक 21 रोजी होणार आहे.
प्रभाग 13, प्रभाग 18, उर्दू शाळा, झामी चौक, शाह आलम नगर येथे सकाळ पासून मतदारांची रांग लागली होती. तर काही कॉलनी परिसर व सुशिक्षित वस्तीत निरुत्साह दिसून येत होता. प्रभाग 8 मधील 41 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर संथ गतीने मतदान होत होते. ताडेपुरा भाग, गांधलीपुरा भाग, डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन आदी भागात दुपार पर्यंत शांततेत मतदान सुरू होते. सायंकाळी मात्र मतदारांनी एकच गर्दी केली होती. सहा वाजेच्या सुमारास ताडेपुरा येथील 15 व्या क्रमांकाच्या मतदान केंद्रावर 200 मतदारांची रांग लागली होती. सव्वा आठ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. गांधलीपुरा येथे देखील उशिरापर्यंत मतदान सुरू होते.
तीन केंद्रांवर मशीन बदलले नगरपरिषद निवडणुकीत शहरातील 97 मतदान केंद्रांवर मतदान सुरू असताना काही ठिकाणी मतदान मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. साईबाबा स्कूल (केंद्र 72), अँग्लो उर्दू स्कूल (केंद्र 67) आणि संत सखाराम महाराज केंद्र (केंद्र 41) येथे प्रत्येकी एक मशीन बंद पडल्याने क्षणिक अडथळा निर्माण झाला. तात्काळ सूचना मिळताच निवडणूक निर्णय अधिकारी निवृत्ती गायकवाड व सहाय्यक अधिकारी रुपेशकुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी व तांत्रिक पथक

बदलत काही मिनिटांतच मतदान पुन्हा सुरळीत करण्यात आले.

सुमारे 582 कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर होते. त्यात मतदान केंद्राध्यक्ष सहाय्यक अधिकारी, शिपाई आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

एकाच मतदाराच्या नावाने आधी कोणीतरी मतदान करून जाण्याचे देखील प्रकार घडल्याने अशा ठिकाणी प्रदत्त मतदान घेण्यात आले. प्रदत्त मतदानासाठी स्वतंत्र मतपत्रिकाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक मतदान

केंद्रावर दिव्यांग, दुर्बल आणि वृद्ध मतदारांसाठी व्हील चेअर ची व्यवस्था करण्यात आली होती. किरकोळ तक्रारी वगळता मतदान शांततेत पार पडले. डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, शरद काकळीज, भगवान शिरसाठ, सिद्धांत शिसोदे, गणेश पाटील, प्रशांत पाटील, नितीन कापडणे, विनोद संदानशिव यांच्यासह विविध पोलीस होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. निवडणूक निर्णय अधिकारी निवृत्ती गायकवाड, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या सह विविध काधिकार्यांनी मतदान केंद्रांना भेटी देऊन परिस्थितीवर नियंत्रण ठेवले होते.

अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 : उत्साहात मतदान, सुशोभीकरण केलेल्या केंद्रांवर सेल्फीचा ट्रेंड

विप्रो कन्सुमर केअर अमळनेर व आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर, यांच्या संयुक्त विद्यमाने अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 पाच बूथ सुशोभीकरण करण्यात आले होते जेथे,शहरातील मतदारांनी उत्साहाने मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीचा सण साजरा केला. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शहरातील पाचही मतदान केंद्रांचे आकर्षक सुशोभीकरण करण्यात आले होते. रांगोळी, फुगे सजावट, सेल्फी पॉइंट, आकर्षक मंडप, तसेच लोकशाहीविषयक संदेश देणारी विविध थिम्स यामुळे मतदारांचे लक्ष वेधले गेले.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, नगरपरिषद सीईओ गणेश शिंदे, तसेच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शिस्तबद्ध पार पडली.

मतदान केंद्रांवर ‘स्त्रीशक्ती–लोकशाहीची प्रेरणा’, अँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल ‘युवा शक्ती–मतदानाची ऊर्जा’, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल ‘हरित शक्ती–पर्यावरणपूरक मतदान’ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल, ‘अभिमान शक्ती–माझं मत, आरोग्यवर्धिनी केंद्र नगरपालिका पिंपरी रोड, माझा अभिमान’, आणि ‘जवाबदार शक्ती–मतदान म्हणजे कर्तव्य’ नगरपरिषद कार्यालयअशा पाच वेगवेगळ्या थिम्सवर आकर्षक सजावट आणि माहितीपर पोस्टर्स मतदार केंद्रावर लावण्यात आले होते. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता वाढवण्यास मोठी मदत झाली.
मतदानासाठी आलेल्या नागरिकांनी केंद्रांवरील सेल्फी पॉईंटवर फोटो काढत लोकशाहीबद्दलचा अभिमान व्यक्त केला. विप्रो कंपनी आणि आधार संस्थेच्या संयुक्त सहकार्याने हे सर्व उपक्रम पार पडले. मतदारांनी सजावट आणि जनजागृती उपक्रमांचे भरभरून कौतुक केले.
या उपक्रमात विप्रोचे फॅक्टरी मॅनेजर विजय बागजीलेवाले, पर्चेस मॅनेजर मिलिंद मार्कंडे, फायनान्स ऑफिसर आनंद निकम, विचार मॅनेजर चेतन थोरात, वेलफेअर मॅनेजर सुधीर बडगुजर आदींनी सक्रिय सहभाग नोंदवला.
आधार संस्थेच्या अध्यक्ष डॉ. भारती पाटील, कार्यकारी संचालक रेणू प्रसाद प्रा. विजय वाघमारे तसेच टीम सदस्य दिपक संदानशिव, अश्विनी भदाणे, मुरलीधर बिरारी, राकेश महाजन, तौसिफ शेख, दिपक विश्वेश्वर, योगिता पाटील, यास्मिन शेख, भावना सूर्यवंशी, उर्जीता शिसोदे, आनंद पगारे, मोहिनी धनगर, समाधान अहिरे, वंदना पावरा, सोनल पावरा, संगीत मैलागीर, सीमा शेख, सोनी चव्हाण यांसह पंडित जवाहरलाल समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही खास योगदान दिले.
सुशोभीकरण केलेली केंद्रं, उत्साही मतदार, आणि जनजागृतीच्या नवनवीन कल्पना यामुळे अमळनेरमध्ये लोकशाहीचा उत्सव यंदा विशेष रंगतदार ठरला.
शांततापूर्ण वातावरणामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली.. यांनी लोकशाहीच्या निवडणुकीच्या उत्साहामध्ये सर्वांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *