विशेष विद्यार्थ्यांसोबत सरपंच पाटील यांचा आनंददायी वाढदिवस
1 min read

विशेष विद्यार्थ्यांसोबत सरपंच पाटील यांचा आनंददायी वाढदिवस

Loading

विशेष विद्यार्थ्यांसोबत सरपंच पाटील यांचा आनंददायी वाढदिवस

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील नंदगाव येथील सरपंच श्री. दामोदर सुखदेव पाटील यांनी आज, दि. ०१/१२/२०२५ रोजी चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे संचलित दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे विशेष विद्यार्थ्यांसोबत आपला वाढदिवस साजरा केला.
श्री. दामोदर पाटील यांच्यासोबत सरपंच श्री. योगेश निंबा कोळी (कलाली) उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासो. डॉ. योगेश रघुनाथ महाजन यांच्या वतीने शाळेच्या विशेष शिक्षकांकडून आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
श्री. दामोदर पाटील यांनी विद्यार्थ्यांना अल्पोपहार देऊन त्यांचा आनंद वाढविला तसेच शाळेसाठी २१००/- रुपये देणगी दिली. त्यांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासो. डॉ. योगेश रघुनाथ महाजन आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले. तसेच समाजातील सर्व घटकांना विशेष विद्यार्थ्यांसोबत आनंदाचे क्षण साजरे करण्याचे आवाहन केले. या वेळी सर्व कर्मचारी उपस्थित होते आणि कार्यक्रम रंगतदार झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *