प्रभाग 16 मध्ये अपक्ष लाट! महेश देशमुख – नीलिमा पाटील यांचा विजय ठरतोय? ‘ना पक्ष, ना झेंडा… जनता जनार्दन हा एकच पक्ष!’ – मतदारांचा स्पष्ट संदेश
![]()
प्रभाग 16 मध्ये अपक्ष लाट! महेश देशमुख – नीलिमा पाटील यांचा विजय ठरतोय?
‘ना पक्ष, ना झेंडा… जनता जनार्दन हा एकच पक्ष!’ – मतदारांचा स्पष्ट संदेश
अमळनेर प्रतिनिधी –
अमळनेर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग 16 मध्ये अपक्ष नेतृत्वाची लाट वेगाने उसळत आहे. ‘ना पक्ष, ना झेंडा… जनता जनार्दन हा एकच पक्ष!’ असा नारा जोरात घुमतोय, आणि त्याच्या मागे महेश प्रभाकर देशमुख व सौ. नीलिमा विश्वनाथ पाटील यांचा उमेदवार संघ आहे.
महेश देशमुख हे शांत, संयमी आणि प्रामाणिक नेते म्हणून ओळखले जातात, तर नीलिमा पाटील महिला, युवक आणि ज्येष्ठ मतदारांचे प्रश्न तत्परतेने ऐकणारी सर्वसमावेशक नेत्री म्हणून लोकप्रिय आहेत.
याच बरोबर, रवी पाटील हे चोबीस तास सामाजिक सेवेला प्राधान्य देणारे आहेत, कोणताही प्रश्न असो ते तात्काळ निरसन करतात, सुख असो दु:ख्ख यात नेहमीच प्रभागात हजर राहतात. त्यांच्या आई अगोदर नगरसेविका होत्या, आणि त्यांनी आपली पत्नी उमेदवारीसाठी पुढे आणून महिलांचा सन्मान केला आहे.
पाटील कुटुंबाची सामाजिक परंपरा आणि सातत्यपूर्ण सेवा या उमेदवारीला अधिक बळ देत आहेत. प्रभागातील मतदारांचा स्पष्ट संदेश आहे – रस्ते, पाणीपुरवठा, गटारी, अंधारी ओपन प्लेस आणि सुशोभीकरणासाठी खात्रीशीर उपाय हवा, आणि त्यासाठी महेश देशमुख व नीलिमा पाटीलच योग्य निवड आहेत.
प्रचारात महिलांची मोठी उपस्थिती, युवांचा उत्साह आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद यामुळे वातावरण अधिक तापले आहे. गल्ली-बोळातून घोषणांचा जल्लोष ऐकू येतो —
“या वेळी ठरलं निश्चित… महेश देशमुख – नीलिमा पाटील यांचा विजय निश्चित!”
शहरभर एकच संदेश घुमतोय — प्रभाग 16 मध्ये अपक्ष नेतृत्वाला मिळालं आहे जनतेचं प्रचंड समर्थन!


