जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेत लोकशाही दिन; 30 अर्ज दाखल
1 min read

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेत लोकशाही दिन; 30 अर्ज दाखल

Loading

*जिल्हास्तरीय लोकशाही दिनात 30 अर्ज प्राप्त*

जळगाव, दिनांक 1 डिसेंबर 2025 (जिमाका वृत्तसेवा):
जिल्हास्तरीय लोकशाही दिन आज अल्पबचत भवन येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. आजच्या लोकशाही दिनात एकूण 30 अर्ज प्राप्त झाले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण तसेच संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

नोव्हेंबर महिन्याच्या लोकशाही दिनी 87 अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी 30 अर्जांवर कार्यवाही पुर्ण झाली असून प्रलंबित अर्जाची संख्या 57 आहेत.

आजच्या लोकशाही दिनामध्ये नागरिकांनी विविध प्रश्नांसंदर्भात अर्ज सादर केले असून, अर्जांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी निर्देश देण्यात आले, प्राप्त अर्जांचा विभागवार आढावा घेऊन अर्जांवर कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *