नगरपरिषदेच्या विकासाचा नवा अध्याय – प्रभागात डॉ. परिक्षीत बाविस्कर यांचा विजयी संकल्प!”
![]()
“नगरपरिषदेच्या विकासाचा नवा अध्याय – प्रभागात डॉ. परिक्षीत बाविस्कर यांचा विजयी संकल्प!”
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर शहरातील नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत अनुसूचित जमातींच्या नगराध्यक्ष पदासाठी डॉ. परिक्षीत श्रीराम बाविस्कर यांनी शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हावर उमेदवारी जाहीर केली आहे.
उच्चशिक्षित, M.D. Medicine पदवीधर, डॉ. बाविस्कर सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक व कलात्मक उपक्रम राबवत आहेत. अंबरीश टेकडीवरील 22 फूट उभारलेली श्री हनुमंत राया ची भव्य मूर्ती आणि टेकडीवरील जिम सुविधा हे त्यांच्या कार्याचे प्रत्यक्ष उदाहरण ठरले आहे.
डॉ. बाविस्कर यांचा जन्म कसर गल्लीतील ईच्छादेवी चौकात झाला आणि त्यांनी स्थानिक मराठी शाळेतून प्राथमिक शिक्षण, तसेच अमळनेरमधील हायस्कूल व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. शिक्षण अधिकारी वडील आणि संस्कारी 22 कर कुटुंबातून आलेल्या डॉ. बाविस्कर यांची निवडणूक सेवा, प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेचा संदेश घेऊन येत आहे.
मतदारांना 22 कर परिवाराचे प्रतिनिधी दिलीप सोनवणे आणि ज्योतिर्मयी श्रीराम बाविस्कर यांनी आशीर्वाद देत, डॉ. बाविस्कर यांना निवडणुकीसाठी पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.
नगरपरिषदेच्या विकासाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये त्यांचा समावेश आहे:
सामुदायिक आरोग्य केंद्रांचे आधुनिकीकरण – डिजिटल हेल्थ चेकअप सुविधा, मोफत तपासणी शिबिरे
शहरातील सार्वजनिक उद्यानांचे स्मार्ट सुशोभिकरण – फिटनेस उपकरणे, सोलर लाईटिंग, स्मार्ट बेंचेस
पाण्याची बचत व स्वच्छता अभियान – टँक स्वच्छता, पाणीपुरवठा सुधारणा, जलसंचय उपक्रम
शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम – स्थानिक शाळांमध्ये विज्ञान व कला प्रदर्शन, योग व फिटनेस शिबिरे
स्मार्ट शहर उपाययोजना – रस्ते-नाली व्यवस्थापन, सीसीटीव्ही सुरक्षा, स्मार्ट स्ट्रीट लाईट्स
नगराध्यक्ष पदासाठी डॉ. बाविस्कर यांचे संपूर्ण शिवसेना नेतृत्व, खासदार डॉ. प्रशांत शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे, माजी आमदार शिरीष दादा चौधरी व सर्व तालुका-स्तरीय पदाधिकारी यांनी प्रचारासाठी पूर्ण पाठबळ दिले आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या रॅली व सभा आयोजित करून शहरभर जनतेत जागरूकता वाढवली जात आहे.
शहरातील नागरिकांमध्ये नगरपालिकेवर बदल हवा आहे अशी जाणीव स्पष्ट असून, नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी चाललेली लढाई प्रभागातील प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे शहरात शिवसेनेचा भडकाव फडकवणे अनिवार्य होईल, अशी चर्चा सध्या जोरात आहे.
स्थानिक पदाधिकारी व मतदार यांचा ठाम विश्वास आहे की, सुशिक्षित व विद्याविभूषीत डॉ. परिक्षीत बाविस्कर यांचा विजय शंभर टक्के निश्चित आहे, आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा नवा अध्याय तेच उघडणार आहेत.
टेकडी ग्रुपचा सदस्य दिलीप राजाराम सोनवणे यांनी मतदारांना आवाहन केले आहे की, नगराध्यक्ष पदासाठी डॉ. बाविस्कर यांना आणि शहरातील विविध प्रभागातील अधिकृत शिवसेना उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे. शिवसेना पक्षाचे उपमुख्यमंत्री आदरणीय ना एकनाथ शिंदे, नगरविकास खाते ना. गुलाबराव पाटील आणि माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांचे पाठबळ देखील विकासाच्या दृष्टीने अमूल्य ठरेल.असे त्यांनी सांगितले.

