प्रभाग 16 अ मध्ये विकासाचा नवा अध्याय – राजेश बापू पुन्हा रणभूमीवर!
![]()
प्रभाग 16 अ मध्ये विकासाचा नवा अध्याय – राजेश बापू पुन्हा रणभूमीवर!
अमळनेर प्रतिनिधी
प्रभाग 16 अ च्या उज्ज्वल भविष्यासाठी अनुभवसंपन्न आणि विश्वासू नेतृत्व पुन्हा एकदा पुढे आले आहे. अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये माजी नगरसेवक पाटील राजेश शिवाजीराव उर्फ ‘राजेश बापू’ यांना भाजप–राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत समर्थन प्राप्त असून, अमळनेर तालुका शहर विकास आघाडीच्या पाठबळाखाली ते उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत.
माजी नगरसेवक म्हणून त्यांनी प्रभागात केलेल्या ठोस आणि लोकाभिमुख कामांत समावेश आहे:
आर.के. नगर सोसायटी – रस्ते–गटार विकासकामे
भालेराव नगर ओपन प्लेस – सुशोभिकरण
पाटील गडी परिसर – काँक्रिटीकरण
गुरुकृपा कॉलनी – सातत्यपूर्ण रस्ते विकास
रवी नगर – कम्युनिटी हॉल उभारणी
24 तास पाणीपुरवठा व आधुनिक हायमास्ट सोलर लाईट्स
आगामी काळासाठी त्यांनी जाहीर केलेला प्रभाग विकास रोडमॅप देखील महत्वाचा आहे. यामध्ये:


आर.के. नगर मुख्य गेट रस्ता काँक्रिटीकरण
गुरुकृपा–विद्याविहार–सुरभी कॉलनी रस्ते आधुनिकीकरण
संताजी नगर रस्ते–गटारी–वीज सुविधा सुधारणा
आर.के. नगर ओपन प्लेस सुशोभिकरण
मुंदडा नगर व विद्याविहार मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण
सर्व बिघडलेले रस्ते नव्याने तयार करणे
राजेश बापू म्हणाले,
“ही माझी उमेदवारी नाही… हा प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प आहे. नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडवून, सुविधा दारात आणणे हेच माझे ध्येय आहे.”
प्रभागातील नागरिक त्यांच्या कामाची छाप अजूनही स्मरणात ठेवतात, आणि राजेश बापू पुन्हा प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

