“अपक्षाची जोरदार लाट! प्रभाग 16 मध्ये महेश देशमुख–नीलिमा पाटील यांनाच जनतेचा कौल!”
1 min read

“अपक्षाची जोरदार लाट! प्रभाग 16 मध्ये महेश देशमुख–नीलिमा पाटील यांनाच जनतेचा कौल!”

Loading

“अपक्षाची जोरदार लाट! प्रभाग 16 मध्ये महेश देशमुख–नीलिमा पाटील यांनाच जनतेचा कौल!”

अमळनेर प्रतिनिधी –
अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये प्रभाग 16 मध्ये ‘ना पक्ष, ना झेंडा… जनता जनार्दन हा एकच पक्ष!’ असा नारा जोरात घुमू लागला आहे. अपक्ष नेतृत्वाची मागणी तीव्र होत असताना 16 ‘अ’ मधून महेश प्रभाकर देशमुख आणि 16 ‘ब’ मधून सौ. नीलिमा विश्वनाथ (रवी) पाटील यांच्याभोवती एकीची अभूतपूर्व लाट उसळली आहे.

महेश देशमुख हे शांत, संयमी, जमिनीवरचे आणि प्रामाणिक नेतृत्व म्हणून ओळखले जातात, तर नीलिमा पाटील महिलांच्या, युवांच्या आणि ज्येष्ठांच्या प्रश्नांवर तत्पर लक्ष देणारे सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व म्हणून लोकप्रिय आहेत. पाटील कुटुंबाची सामाजिक परंपरा आणि रवी पाटील यांची सततची सेवा या उमेदवारीला अधिक बळ देत आहे. सासू नगरसेविकेनंतर सुनेला संधी देण्यासाठी रवी पाटील यांनी स्वतः बाजूला होऊन पत्नीला प्राधान्य दिल्याची चर्चा प्रभागात चांगलीच रंगली आहे.
रस्ते, पाणीपुरवठा, गटारी, अंधारे ओपन प्लेस, सुशोभीकरणाच्या उणिवा अशा वर्षानुवर्षे भेडसावणाऱ्या प्रश्नांवर खात्रीशीर उपाय हवा… या मतदारांच्या भावना लक्षात घेता प्रभाग 16 मध्ये एकच आवाज उठू लागला आहे—

“उपाय हवा तर—महेश देशमुख आणि नीलिमा पाटील हीच योग्य निवड!”

प्रचारात महिलांची मोठी उपस्थिती, युवांचा उत्साह आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद यामुळे वातावरण अधिक तापले असून प्रत्येक गल्ली-बोळातून घोषणांचा जल्लोष ऐकू येतो—

“या वेळी ठरलं निश्चित…
महेश देशमुख – नीलिमा पाटील यांचा प्रचंड विजय निश्चित!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *