धडाडी, दृष्टी आणि दमदार नेतृत्व, सर्वांसाठी उभा विकासाचा सूर्यप्रकाश. प्रत्येक पायरीवर विश्वासाची नांदी, प्रभाग 17 अ मध्ये स्वप्ना विक्रांत पाटीलची ओळख खास!
![]()
धडाडी, दृष्टी आणि दमदार नेतृत्व,
सर्वांसाठी उभा विकासाचा सूर्यप्रकाश.
प्रत्येक पायरीवर विश्वासाची नांदी,
प्रभाग 17 अ मध्ये स्वप्ना विक्रांत पाटीलची ओळख खास!
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये प्रभाग 17 अ मधून स्वप्ना विक्रांत पाटील उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. प्रभागातील नागरिकांच्या दैनंदिन गरजा, पायाभूत सुविधा, महिला-सुरक्षा आणि तरुणांच्या संधी या सर्वांवर त्यांचा लक्ष केंद्रित आहे. माजी नगरसेवक विक्रांत भास्करराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वप्ना पाटीलचा प्रचार आत्मविश्वासाने पुढे सरकत आहे.
त्यांच्या संवादशैलीतील आत्मीयता, महिलांच्या उत्स्फूर्त सहभाग, तरुणांचा उत्साह आणि ज्येष्ठ नागरिकांचा पाठिंबा यामुळे प्रभागात विकासाची नवी संधी स्पष्टपणे दिसून येत आहे.

