प्रभाग 3 ‘अ’ मध्ये पूजांचा उदय – शिक्षण, सेवा आणि दोन समाजांचे ऐक्य  प्रभागातील मतदारांकडून उस्फुर्त प्रतिसाद
1 min read

प्रभाग 3 ‘अ’ मध्ये पूजांचा उदय – शिक्षण, सेवा आणि दोन समाजांचे ऐक्य प्रभागातील मतदारांकडून उस्फुर्त प्रतिसाद

Loading

प्रभाग 3 ‘अ’ मध्ये पूजांचा उदय – शिक्षण, सेवा आणि दोन समाजांचे ऐक्य

प्रभागातील मतदारांकडून उस्फुर्त प्रतिसाद

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
आगामी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग 3 ‘अ’ (अनुसूचित जमाती महिला राखीव) मधून शिवसेना (एकनाथ शिंदे गट) तर्फे उमेदवारी दाखल केलेल्या पूजा रमेश शिंदे (पूजा सिंधी) यांची चर्चा शहरात वेगाने वाढत आहे. उच्चशिक्षित, कौशल्यसंपन्न आणि दोन प्रभावी समाजांना जोडणाऱ्या या तरुण उमेदवाराकडे प्रभागातील महिला नेतृत्वाचा नवा पर्याय म्हणून पाहिले जात आहे.
B.A., M.A., M.Sc., B.Ed अशी शैक्षणिक पात्रता, तसेच टायपिंग, स्टेनो व MS-CITचा तांत्रिक अनुभव यामुळे पूजांचे कामकाज अधिक परिणामकारक होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पारधी समाजाच्या शौर्यपरंपरेचा वारसा आणि विवाहानंतर सिंधी समाजाशी जुळलेले दृढ नाते यामुळे त्यांना दोन्हीकडून मोठा पाठिंबा मिळत आहे.
‘लाडकी बहीण’ योजनेची सखोल जाण असलेल्या पूजांनी ही योजना पात्र महिलांपर्यंत पोहोचवणे हे आपले प्राधान्य असल्याचे सांगितले. “प्रभाग 3 माझं स्वराज्य; सेवा आणि निष्ठा हीच माझी ओळख” असे त्या म्हणतात.
स्थानिक नागरिकांच्या मते, शैक्षणिक भक्कमपणा, सेवा वृत्ती, पारदर्शक कामकाजाची तयारी आणि दोन समाजांचे ऐक्य या गुणांमुळे पूजा शिंदे-सिंधी प्रभाग 3 ‘अ’ मधील प्रभावी आणि विजयी दावेदार ठरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *