अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025: अण्णासाहेब प्रताप साळी यांचा प्रभागामध्ये मोठा पाठिंबा  सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांसह मितभाषी नेतृत्व; प्रभाग १२ ब मधील मतदारांच्या मनावर ठसलेली छाप
1 min read

अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025: अण्णासाहेब प्रताप साळी यांचा प्रभागामध्ये मोठा पाठिंबा सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांसह मितभाषी नेतृत्व; प्रभाग १२ ब मधील मतदारांच्या मनावर ठसलेली छाप

Loading

अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025: अण्णासाहेब प्रताप साळी यांचा प्रभागामध्ये मोठा पाठिंबा

सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांसह मितभाषी नेतृत्व; प्रभाग १२ ब मधील मतदारांच्या मनावर ठसलेली छाप

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर शहरातील उद्योजक आणि माजी नगरसेवक अण्णासाहेब प्रताप छबुलाल साळी हे प्रभाग १२ ब मध्ये मतदारांच्या मनावर ठसलेली छाप सोडत आहेत. त्यांचा मितभाषी स्वभाव, सामाजिक व शैक्षणिक उपक्रम आणि प्रत्येकाच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्याची सवय यामुळे शहरातच नाही तर संपूर्ण तालुक्यात त्यांचा मित्रांचा आणि पाठिंब्याचा मोठा गोतावळा आहे.
स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक सामाजिक उपक्रम राबवणारे अण्णासाहेब आपल्या कार्यकर्त्यांसह जनतेच्या सेवा कार्यात खंबीरपणे उभे राहतात. त्यांच्या या निस्वार्थ कामगिरीमुळे प्रभागातील मतदारांचा विश्वास आणि पाठिंबा अखंड आहे.
विशेष म्हणजे, त्यांच्या प्रभागातील मतदारांचा विश्वास इतका प्रबल आहे की, स्थानिक राजकीय तज्ज्ञ मानतात की, अण्णासाहेब प्रताप साळी यांचा विजय शंभर टक्के निश्चित आहे.
अण्णासाहेब हे माजी नगरसेवक असून, श्री भद्रा प्रतीक मॉल, अमळनेर चे संचालकही आहेत. जनतेच्या हक्कासाठी आणि जनसेवेच्या नवनवीन अध्यायासाठी त्यांचा सहभाग पुढील नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये निर्णायक ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *