“छत्रपतींच्या शपथेत निष्ठावंत सेवक: अमळनेरमध्ये जनतेच्या सेवेस सज्ज इमानदार पारधी, समाजाची कन्या पूजा शिंदे-सिंधी”
1 min read

“छत्रपतींच्या शपथेत निष्ठावंत सेवक: अमळनेरमध्ये जनतेच्या सेवेस सज्ज इमानदार पारधी, समाजाची कन्या पूजा शिंदे-सिंधी”

Loading

शिवरायांचा सेवेकरी असलेले इमान्दार पारधी

समाजाची कन्या आणि सिंधू संस्कृतीच्या सिंधी समाजाची सून

*पूजा रमेश शिंदे-सिंधी*
_____________________

छत्रपतिंच्या शपथेने अंमळनेरमध्ये करणार जनतेची सेवा

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)–
येऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे गट) कडून प्रभाग क्रमांक 3 मधून उमेदवारी दाखल केलेल्या पूजा रमेश शिंदे-सिंधी यांची चर्चा शहरात जोरदार रंगली आहे. पारधी समाजाची कन्या म्हणून सौ. पूजांचा वारसा हा शुरतेचा आहे. जंगल हे आपले घर मानून जगणारे पारधी इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्यात जीवापाड सेवा करत होते. जंगलातील शिकार करत असताना पारधी समाजाला निसर्गाने चिवटपणा आणि शौर्य दिले आहे. इमानदारपणा हा पारधी समाजाचा गुण आहे.याच गुणांचा वापर करून शिवसेनेच्या पूजा ताई सिंधी / शिंदे पारधी विजयी झाल्यास आपल्या वार्डाची स्वराज्य प्रमाणे सेवा करणार आहेत.
पारधी समाजाचा इतिहास खूप महत्त्वाचा आहे. जंगलात राहणारे हे सर्व पारधी बांधव जंगलाला आपले घर मानून त्याचे रक्षण करत आलत आले आहेत. जंगलातील सर्व प्रकारची जडीबुटी औषधे, प्राण्यांचे आवाज यांचा अभ्यास करणारे पारधी आहेत. हत्ती असू दे नाहीतर वाघ सिंह !! या प्राण्यांसारखे शक्ती असणारा बलवान समाज म्हणजे पारधी समाज होय. शूरतेचा सूर्य म्हणजे पारधी समाज. या समाजाच्या रक्तातच लढण्याचा गुण असतो. हा गुण घेऊन सौ पूजा ताई पंकज सिंधी / शिंदे पारधी या सुद्धा नगरपालिका निवडणुकीमध्ये लोकशाही मार्गाने लढत आहेत. त्यांचा विजय होईल ही त्यांना खात्री आहे. अनेक संकटे जीवनात येऊन सुद्धा त्या कधीही डगमगल्या नव्हत्या. हार मानने त्यांच्या स्वभावात नाही. कधीही न थकणे व सतत कुटूंब परिवाराची सेवा करत राहणे हा त्यांचा जन्मतः गुण ते जनतेच्या सेवेसाठी वापरणार आहेत.
महिला नेतृत्व त्या करत आहेत. तरुण महिला म्हणून राजकारणात उभे राहणे याची त्यांनी जणू प्रेरणा दिली आहे. महिला सक्षमीकरणाची त्या एक उदाहरण आहेत.
वार्ड क्रमांक तीन मध्ये त्यांचे नेतृत्व जनतेच्या फायद्याचे ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
सौ. पूजां ताईंनी नेहमीच समाजातील दुर्बल घटकांसाठी काम करण्याची तयारी दाखवली आहे.
पत्रकार तथा हिंदू प्रेमी पंकज बलराम सिंधी यांच्याशी विवाह करून त्यांनी सिंधी समाजाशी घट्ट नाते जोडले आहे. त्यामुळे त्या दोन समाजांमध्ये ऐक्य निर्माण करणारा पूल ठरत आहेत.
आपल्या उमेदवारीबद्दल सौ पूजा सिंधी/ शिंदे पारधी म्हणाल्या की, “प्रभाग क्रमांक ३ माझ्यासाठी सेवा करण्याची मोठी संधी आहे. हा प्रभाग मी स्वराज्याप्रमाणे मानते आणि त्याच्या विकासासाठी निष्ठापूर्वक काम करण्याची तयारी ठेवते.”
त्यांना नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे . स्थानिक नागरिकांच्या मते सौ. पूजांच्या उमेदवारीमुळे अमळनेर शहरात महिलांचे नेतृत्व दिसत आहे. पारधी समाजाची कन्या आणि सिंधी समाजाची सून म्हणून त्या खऱ्या अर्थाने समाज सेवा करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *