निश्चय विकासाचा, संकल्प विजयाचा — विनोद मधुकर कदमांची उमेदवारी जोरदार चर्चेत
![]()
निश्चय विकासाचा, संकल्प विजयाचा — विनोद मधुकर कदमांची उमेदवारी जोरदार चर्चेत
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025-30 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 15 ‘अ’ मध्ये नागरिकांच्या अपेक्षा, विकासाचा निश्चय आणि पारदर्शक कारभाराचे ध्येय यांसह विनोद मधुकर कदम यांनी अधिकृत उमेदवारी दाखल केली आहे.
अमळनेर तालुका शहर विकास आघाडीच्या वतीने नगरसेवक पदासाठी कदम यांची उमेदवारी घोषित होताच प्रभागात राजकीय वातावरणाला वेग आला आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते, नगरपरिषदेत प्रभावी कामगिरी करणारे मान्यवर आणि स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा यामुळे त्यांची उमेदवारी अधिक बळकट झाल्याचे दिसत आहे.
“निश्चय विकासाचा – संकल्प विजयाचा” या घोषवाक्यासह कदम यांनी प्रभागातील नागरिकांना विश्वास दिला आहे की, मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण या क्षेत्रांमध्ये दर्जेदार काम करणे हेच आपले प्रमुख ध्येय असेल.
राष्ट्रवादी काँग्रेस अमळनेर शहराचे कार्याध्यक्ष आणि माजी नगरसेवक म्हणून काम केलेल्या कदम यांचा प्रशासकीय अनुभव, सामाजिक बांधिलकी आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यामुळे त्यांना व्यापक पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येते.
प्रभागातील अनेक नागरिकांनी “जमिनीवर काम करणारा नेतृत्व” म्हणून कदमांविषयी समाधान व्यक्त केले आहे. निवडणूक प्रचाराची सुरुवात होताच प्रभागात भेटीगाठी, संवाद आणि जनसंपर्क दौरे यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आगामी निवडणुकीत प्रभाग क्र. 15 ‘अ’ मधील स्पर्धा रंगतदार होणार असून, विनोद मधुकर कदम हे मजबूत दावेदार म्हणून उदयास आले आहेत.

