बाजारपेठेतील प्रचार दौऱ्यादरम्यान जितेंद्र ठाकूर यांना व्यापाऱ्यांचा जोरदार पाठिंबा…
1 min read

बाजारपेठेतील प्रचार दौऱ्यादरम्यान जितेंद्र ठाकूर यांना व्यापाऱ्यांचा जोरदार पाठिंबा…

Loading

बाजारपेठेतील प्रचार दौऱ्यादरम्यान जितेंद्र ठाकूर यांना व्यापाऱ्यांचा जोरदार पाठिंबा…

अमळनेर – नगराध्यक्षपदासाठी शहर विकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र (जितू) हरिश्चंद्र ठाकूर यांच्या प्रचार दौऱ्याला शहरातील व्यापारी वर्गाने त्यांना उत्साहपूर्ण प्रतिसाद देत जोरदार पाठिंबा दर्शवला.
अमळनेर बाजारपेठेत निघालेल्या प्रचार दौऱ्यादरम्यान ठाकूर यांनी व्यावसायिकांशी संवाद साधत शहरातील व्यापारविषयक अडचणी, सुरक्षिततेचे प्रश्न, पायाभूत सुविधांतील कमतरता याबाबत चर्चा केली. यावेळी अनेक व्यावसायिकांनी एकमताने “आपल्या व्यापारी वर्गाचा खरा साथीदार जितू भाऊ नगराध्यक्षपदी विराजमान होणार”, अशी प्रतिक्रिया दिली.

शहरातील व्यापार -वाणिज्याला गती देणे, सुरक्षित व स्वच्छ बाजारपेठ निर्माण करणे, पार्किंग- वाहतूक व्यवस्थेतील अडचणी कमी करणे आणि व्यापाऱ्यांच्या महत्वाच्या मागण्यांचे निवारण करण्याला प्राधान्य देणार असल्याचे जितू ठाकूर यांनी सांगितले.
प्रचारफेरीदरम्यान नागरिक, महिला, तरुण आणि व्यावसायिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. “अमळनेरच्या विकासासाठी, व्यापाऱ्यांच्या सुरक्षित उद्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी जितू ठाकूर यांनाच विजयी करा!” असे आवाहन व्यावसायिक वर्गातून केले जात असून त्यामुळे व्यापक आणि सकारात्मक वातावरण तयार होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *