अमळनेरचे सांस्कृतिक वैभव जपूया, गुंडगिरीला हद्दपार करूया  शहर विकास आघाडीचा भयमुक्त अमळनेर चा नारा
1 min read

अमळनेरचे सांस्कृतिक वैभव जपूया, गुंडगिरीला हद्दपार करूया शहर विकास आघाडीचा भयमुक्त अमळनेर चा नारा

Loading

अमळनेरचे सांस्कृतिक वैभव जपूया, गुंडगिरीला हद्दपार करूया

शहर विकास आघाडीचा भयमुक्त अमळनेर चा नारा

अमळनेर(प्रतिनिधी):-
संत सखाराम महाराज, साने गुरुजी यांचा वसा असलेल्या आपल्या अमळनेर शहराला गुंडगिरी मुक्त करून शहराचे सांस्कृतिक वैभव जपण्याचे आवाहन अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
२०१४ मध्ये नंदूरबार हून आलेल्या व्यक्तीने पाच वर्षात अक्षरक्ष गुंडगिरीच्या माध्यमातून हैदोस घातला होता,कधी नव्हे ते आपले अमळनेर शहर गुंडगिरी व दहशतीच्या वातावरणात वावरत होते.मूठभर लोकांना सोबत घेऊन शहरातील व्यापारी,छोटे व्यावसायिक, निरपराध नागरिकांना वेठीस धरण्याचे धंदे यांनी व यांच्या बगलबच्चांनी केले.मात्र २०१९ मधे अमळनेरकर जनतेने त्या गुंडांच्या “आकाला” त्यांची जागा दाखवली आणि माघारी पाठवले.
आमदार अनिल पाटील यांनी केलेल्या शाश्वत विकासाला जनतेने पुन्हा साथ देत नंदुरबार हून आलेल्या पार्सल ला दुसऱ्यांना दणका दिला आणि अमळनेरची अस्मिता जपण्याचा प्रयत्न केला.
आमदार अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ, माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली अमळनेर शहराला अविरत विकासाच्या मार्गावर नेण्याचे स्वप्न अमळनेर शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र ठाकूर व सर्व ३६ उमेदवारांच्या माध्यमातून पुढे नेले जात आहे.
अमळनेरात २०१४ ते २०१९ दरम्यान अवैध धंद्याची जणू जत्रा भरलेली होती,शहरात व्यापाऱ्यांना,सर्वसामान्य महिलांना होत असलेला त्रास,निरपराध लोकांना धमकावण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेले होते.मात्र २०१९ नंतर अमळनेर तालुक्याने यांना हाकलून लावले आणि त्यामुळे शहरातून गुन्हेगारीचे उच्चाटन झाले, सोबतच दारू, सट्टा यावर निर्बंध घातले गेले,हेच निर्बंध येणाऱ्या काळात अजून कडक करण्यात येणार असून यात सातत्य ठेवायचे असल्यास शहर विकास आघाडीच्या शिट्टी चिन्हासमोरील बटण दाबून सर्व उमेदवारांना निवडून द्यावे लागणार असल्याचे आवाहन आघाडीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
अमळनेर शहर एक परिवार असून आपला परिवार सुरक्षित ठेवायचा असेल तर योग्य व्यक्तींच्या हातात सत्ता देणे महत्त्वाचे आहे,केंद्रात खासदार स्मिता वाघ,राज्यात आमदार अनिल पाटील दोघेही सत्तेत सोबत आहेत तसेच माजी आमदार साहेबराव पाटील यांचे शहराच्या विकासासाठी मार्गदर्शन मिळत असल्याने आपल्या हक्काचा व्यक्ती नगराध्यक्ष असल्यास जास्तीत जास्त निधीच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास साधता येईल.
अमळनेर शहराला सांस्कृतिक सोबत शैक्षणिक वारसा आहे.अनेकदा विद्यार्थीदशेत मूल अवैध धंदे करणाऱ्यांना बळी पडतात,विविध व्यसनांच्या नादी लागतात त्यामुळे आपली भविष्यातली पिढी सुरक्षित ठेवायची असेल तर गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांच्या हातात सत्ता न जाऊ देता शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी शहर विकास आघाडीलाच मतदान करण्याचे आवाहन यावेळी पदाधिकाऱ्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *