शहरी विकास आणि प्रामाणिक नेतृत्व – डॉ. परीक्षीत बाविस्कर यांना अमळनेरकरांचा पूर्ण पाठिंबा ,मा.आमदार शिरीषदादा चौधरींच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिकता आणि सेवा – डॉ. परीक्षीत बाविस्कर नगराध्यक्ष पदासाठी
![]()
शहरी विकास आणि प्रामाणिक नेतृत्व – डॉ. परीक्षीत बाविस्कर यांना अमळनेरकरांचा पूर्ण पाठिंबा
मा.आमदार शिरीषदादा चौधरींच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिकता आणि सेवा – डॉ. परीक्षीत बाविस्कर नगराध्यक्ष पदासाठी
अमळनेर (प्रतिनिधी):
अमळनेर ही संतांची भूमी, पावित्र्य आणि साधेपणाची परंपरा जपणारी आहे. या भूमीच्या सेवेसाठी चारित्र्यसंपन्न, अभ्यासू आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्वाची गरज आहे. ही सर्व गुणवत्ता डॉ. परीक्षीत बाविस्कर यांच्यात आहे, असे माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी नमूद केले.
डॉ. बाविस्कर हे प्रभाग क्रमांक 15 चे रहिवासी, मुळचे अमळनेरकर असून जळगावमध्ये वैद्यकीय सेवेसाठी स्थायिक झाले तरी मन कायम अमळनेरच्या जनतेमध्ये आहे. त्यांनी आपल्या कुटुंबासह प्रभागातील जनतेशी घनिष्ठ संबंध जपले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांची प्रामाणिकता, स्वच्छ चारित्र्य आणि जनतेशी जोडलेले व्यक्तिमत्त्व अमळनेरकरांसमोर स्पष्ट आहे.
माजी आमदार शिरीषदादा चौधरी म्हणाले की, नगराध्यक्ष म्हणून २४ तास जनतेसाठी उपलब्ध राहणे, शहराचे प्रश्न समजून घेणे आणि विकासाला दिशा देणे हे महत्त्वाचे आहे. डॉ. बाविस्कर हे सर्व निकष पूर्ण करणारे उमेदवार आहेत. त्यांच्याविरुद्ध केलेले राजकीय आरोप हे बिनबुडाचे आणि तथ्यहीन आहेत. त्यांच्या कुटुंबाची सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव अमळनेरकरांमध्ये सर्वश्रुत आहे.
नगर विकास आघाडीचे पत्रक आणि काही विरोधकांचे प्रचार लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. परंतु डॉ. बाविस्कर यांच्या स्वच्छ प्रतिमेवरून आणि त्यांच्या कामावरून जनतेला खरी माहिती आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, शहराच्या विकासासाठी महत्त्वाचा निधी मिळणार आहे आणि अमळनेरमध्ये विकासाचे नवे पर्व सुरू होणार आहे.
नगरपालिका ही जनतेची सेवा करण्याची पवित्र संस्था आहे, स्वार्थी उद्योग किंवा भ्रष्ट व्यवहार करण्याचे स्थान नाही. या तत्त्वावर अमळनेरकरांनी डॉ. परीक्षीत बाविस्कर यांना विजयी करण्याचा निर्धार केला आहे.
२ डिसेंबरला अमळनेरकर प्रामाणिकता आणि विकासाला मतदान करून इतिहास रचणार आहेत.


