“प्रभाग 14 मध्ये  मिळते युवा उमेदवार निलेश उर्फ बबलू महाजन यांना मतदारांची पसंती”
1 min read

“प्रभाग 14 मध्ये मिळते युवा उमेदवार निलेश उर्फ बबलू महाजन यांना मतदारांची पसंती”

Loading

सेवा, नेतृत्व आणि विकासासाठी प्रभाग १४ मध्ये निलेश महाजन…

अमळनेर (प्रतिनिधी: ईश्वर महाजन):
अमळनेर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक १४ मधील उमेदवार आघाडीचे अधिकृत उमेदवार महाजन निलेश उत्तम (बबलू महाजन) यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. युवकांमध्ये लोकप्रिय आणि समाजसेवेवर लक्ष केंद्रीत करणारे निलेश महाजन, संत सावता माळी गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष म्हणून संघटन, शिस्त आणि सेवाभाव याचे उत्तम उदाहरण ठरले आहेत.
व्यवसायाने मेडिकल प्रतिनिधी असलेले निलेश, आजारी पेशंट्सना रुग्णालयात मदत करतात आणि गरजेनुसार उपचाराची व्यवस्था करतात. त्यांच्या या सेवाभावामुळे प्रभागातील नागरिक त्यांना आदराने पाहतात.
निलेश महाजन अमळनेर तालुक्याचे आमदार, माजी मंत्री अनिलदादा पाटील, खासदार स्मिताताई वाघ, माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील आणि माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग १४ च्या विकासासाठी नेहमी कटिबद्ध राहणार आहेत, असेही सांगितले जाते.

प्रमुख विकास मुद्दे:

प्रभागातील रस्ते, ड्रेनेज व पायाभूत सुविधा सुधारणा

महिला व युवकांसाठी सांस्कृतिक-खेळ केंद्र

ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सहाय्यता उपक्रम

स्वच्छता, पाणीपुरवठा व स्ट्रीटलाइट सुधारणा

नवीन पाणी टाकी व पाईपलाईन दुरुस्ती

स्थानिक रोजगारासाठी व्यवसायिकांना प्रशासनिक सहकार्य

निलेश महाजन यांचे व्यक्तिमत्त्व आणि सातत्यपूर्ण समाजसेवा प्रभाग १४ मधील मतदारांमध्ये उत्साह निर्माण करत असून, मतदानाच्या दिशेने त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *