जनतेच्या विश्वासाला उतराई होण्यासाठी सज्ज — दीपक पाटील वाघोदेकर लवकरच मोठा निर्णय घेणार!
![]()
जनतेच्या विश्वासाला उतराई होण्यासाठी सज्ज — दीपक पाटील वाघोदेकर लवकरच मोठा निर्णय घेणार!
अमळनेर प्रतिनिधी:
जानवे–मंगरूळ गटातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवक नेतृत्व म्हणून उदयास आलेले कै. धनगर अर्जून पाटील यांचे नातू दिपक पाटील वाघोदेकर यांच्याभोवती प्रचंड उत्सुकता आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. जनतेचा वाढता विश्वास, पदाधिकाऱ्यांचा आग्रह आणि गावोगावी उमटणारा पाठिंबा पाहता, त्यांची उमेदवारी या निवडणुकीत नवे समीकरण तयार करणार हे स्पष्ट झाले आहे.
“उमेदवारीसाठी पक्षांचे फोन येतायत… पण माझा निर्णय जनता ठरवेल”
दिपक पाटील भावुक होत म्हणतात—
“शिंदे गट, शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस— सर्वच पक्षांकडून उमेदवारीची तयारी दाखवली गेली आहे. पदाधिकाऱ्यांचे वारंवार फोन येत आहेत… लोक विचारतात दिपक, कधी उमेदवारी स्वीकारणार?
हा लोकांचा विश्वास माझी ताकद आहे. मात्र मी कोणत्या पक्षाची उमेदवारी स्वीकारावी हे एका क्षणात ठरवणार नाही. मी माझ्या पदाधिकाऱ्यांशी, कार्यकर्त्यांशी, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे— जनतेशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेणार आहे.”
“आजोबांनी शिकवलं… सत्ता नव्हे, सेवा महत्वाची”
ते पुढे म्हणाले—
“माझे आजोबा कै. धनगर अर्जून पाटील नेहमी सांगायचे की सत्ता ही लोकांची असते… आपण फक्त त्यांच्या सेवेसाठी निवडले जातो.
आज मला जनतेने दाखवलेला विश्वास म्हणजे त्यांच्या कार्याचा आशीर्वादच आहे.”
येणाऱ्या आठवड्यात रस्ते, पाटबंधारे, धरणांचे वास्तव सर्वांना दाखवणार — दिपक पाटील
दिपक पाटील यांनी महत्त्वाचा जाहीर कार्यक्रम घोषित केला आहे—
“येत्या आठवड्यात मी जानवे–मंगरूळ गटातील प्रत्येक गावातील रस्त्यांची दुरवस्था, पाटबंधारे व्यवस्थेची मोडतोड, शेतकऱ्यांचे अतिमहत्वाचे प्रश्न, माळण नदीतील बंधाऱ्यांची दुर्दशा, आणि लोटाबाळगी धरणासारखे घोटाळे— या सर्वांची प्रत्यक्ष भेट घेणार आहे.
मी स्वतः या सर्व ठिकाणी जाऊन वास्तव पाहणार, जनतेचे दु:ख ऐकणार आणि यावर उपाययोजना ठरवणार.”
ते स्पष्ट शब्दांत म्हणाले—
“माझी निवडणूक ही सत्तेसाठी नाही… शेतकरी बापाच्या हक्कांसाठी आहे.
शेतकरी वर्ग जो निर्णय देईल, ज्या पद्धतीने माझ्यावर विश्वास ठेवेल, त्याप्रमाणेच मी उमेदवारी स्वीकारणार.
माझी उमेदवारी रोखण्यासाठी अनेक अफवा, अडथळे, दबाव टाकले जात आहेत.
पण मी स्वतःला धोक्यात घालूनही माझ्या शेतकरी बापाच्या तोंडावर हसू आणणार— हेच माझे ध्येय आहे.”


प्रमुख प्राधान्यक्रम — शेतकरी, विद्यार्थी व ग्रामीण विकास
दिपक पाटील वाघोदेकर यांनी जाहीर केलेले प्रमुख मुद्दे:
शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य – पिकांना हमीभाव, बाजार व्यवस्थेची मजबुती
निसरडी व माळण नदीतील बंधाऱ्यांचे पुनर्जीवन – सिंचन वाढवण्यासाठी ठोस पावले
लोटाबाळगी धरणातील घोटाळ्यांची लोकांसमोर तथ्यांसह माहिती
ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षा केंद्र – विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा
तरुणांसाठी रोजगार, मार्गदर्शन व कौशल्य प्रशिक्षण
मुलभूत सुविधांसाठी ठोस आराखडा – रस्ते, वीज, पाणी, आरोग्य सुविधा
दिपक पाटील म्हणतात—
“माझ्या भागाच्या मातीला मी काय देऊ शकतो हे महत्त्वाचे आहे. पक्ष कोणता — हा निर्णय जनतेचा.”
गावोगावी वाढता उत्साह — नवे राजकीय समीकरण स्पष्ट
प्रभागात वाढता जनसंपर्क, किसान भेटी, युवकांचा प्रचंड प्रतिसाद आणि दिपक पाटील यांच्या मनमोकळ्या संवादामुळे समोरचे चित्र स्पष्ट झाले आहे—
या निवडणुकीत जानवे–मंगरूळ गटात नवे नेतृत्व उभे राहत आहे.

