खवशी ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा.. , आदिवासी संस्कृती परंपरा आणि हक्कासाठी जगण्याचा संदेश…
1 min read

खवशी ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा.. , आदिवासी संस्कृती परंपरा आणि हक्कासाठी जगण्याचा संदेश…

Loading

खवशी ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा..

आदिवासी संस्कृती परंपरा आणि हक्कासाठी जगण्याचा संदेश…

अमळनेर तालुका प्रतिनिधी
दिनकर पवार)

खवशी तालुका अमळनेर येथील ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी आदिवासी समाजाची गौरवशाली संस्कृती, रुढी ,परंपरा कला तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदिवासी महानायकांच्या अभिवादन करण्यात आले व आदिवासी समाजाचे हक्काचे संरक्षण शिक्षणाचा प्रसार आणि सामाजिक विकास याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वीर एकलव्य च्या प्रथमचे पूजन आणि माल्यापण ग्रामपंचायत प्रशासिका सौ. आशाताई अरुण गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या वेळी माजी सरपंच भगवान पुरी गोसावी, रवींद्र पवार योगाराज शिरसाट, जिजाबराव कोळी, राकेश गोसावी ,सामाजिक कार्यकर्ते राहुल मराठे ,हरिप्रसाद कपडे, भैय्या पवार, आकाश वाघमारे, विश्वनाथ मोरे अभिमान पवार ,जगतराव पवार, बाळू कापडे ,दिनेश मराठे, आनंदा गोसावी, व तसेच ग्रामसेवकांचे प्रतिनिधी छोटू पवार आदी मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत शिपाई गुलाब वाघ व अरुण वाघ यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *