प्रभाग १४ मध्ये युवकांचा उत्साह उफाळला निलेश उर्फ बबलू महाजन यांच्या उमेदवारीला जबरदस्त प्रतिसाद
1 min read

प्रभाग १४ मध्ये युवकांचा उत्साह उफाळला निलेश उर्फ बबलू महाजन यांच्या उमेदवारीला जबरदस्त प्रतिसाद

Loading

प्रभाग १४ मध्ये युवकांचा उत्साह उफाळला
निलेश उर्फ बबलू महाजन यांच्या उमेदवारीला जबरदस्त प्रतिसाद

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १४ मध्ये युवक नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे निलेश (बबलू) महाजन यांना वाढता पाठिंबा मिळू लागला आहे. अमळनेर तालुका व शहर विकास आघाडी कडून सर्वसाधारण ‘ब’ गटातून ते रिंगणात उतरले असून, पहिल्याच दिवशी मतदारांमध्ये सकारात्मक लाट दिसून येत आहे.
निलेश महाजन हे महाजन समाजातील उदयोन्मुख नेतृत्व. साधी, जमिनीवरची जीवनशैली, सर्वांना आपल्या माणसासारखे वागवण्याची सवय, आणि समाजकार्यातील सातत्य यामुळे युवावर्ग व कुटुंबप्रमुख त्यांच्याकडे विश्वासाने पाहत आहेत.
ते संत सावता माळी गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना सामाजिक भान, संघटनशीलता आणि शिस्तीची उत्तम उदाहरणे त्यांनी घालून दिली. व्यवसायाने मेडिकल प्रतिनिधी असल्यामुळे शहरातील सर्व रुग्णांसाठी कोणत्याही वेळी—रात्री बेरात्री—मदतीसाठी धावून जाणारा सेवाभाव त्यांच्या ओळखीचा अविभाज्य भाग बनला आहे.
रुग्णांना दवाखान्यात नेणे, रक्ताची सोय करून देणे, गंभीर रुग्णांना शहराबाहेर हलवण्याची व्यवस्था करणे यामुळे त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत असते.
त्यांचे भाऊ श्री चंद्रकांत महाजन, यू ज्वेलर्स चे संचालक, व्यापारी वर्गात व सर्वच समाजघटकांमध्ये उत्तम जनसंपर्क राखून आहेत. त्यांच्या या सहकार्याचा लाभ प्रभाग १४ मधील सर्वसामान्य मतदारांनाही होत आहे.
निलेश महाजन यांच्या घराण्याची नगरपरिषद सेवेशी असलेली नाळही भक्कम आहे. त्यांचे आजोबा कै. कृष्णा कौतिक महाजन हे अमळनेर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक होते. त्यांच्या कार्याचे उत्तम मूल्य आजही मतदार स्मरतात.

नगरपरिषदेच्या विकासासाठी निलेश महाजन यांचे काही महत्त्वाचे मुद्दे

प्रभागातील रस्ते व ड्रेनेजची कायमस्वरूपी सुधारणा

महिला व युवकांसाठी सांस्कृतिक-खेळ सुविधा केंद्र

ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सहाय्यता उपक्रम

स्वच्छता, पाण्याची गळती, स्ट्रीटलाइट यांसारख्या तातडीच्या समस्या २४ तासांत निवारण

प्रभागात नवीन पाणी टाकी व पाईपलाईन दुरुस्ती यावर भर

स्थानिक रोजगाराला चालना देण्यासाठी व्यवसायिकांना प्रशासनिक सहकार्य

अशा सर्वांगिण विकासाच्या दृष्टीकोनामुळे आणि सातत्याने लोकांमध्ये राहून काम करण्याच्या वृत्तीमुळे प्रभाग १४ मध्ये निलेश उर्फ बबलू महाजन यांच्या उमेदवारीबद्दल उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, मतदानाच्या दिशेने त्यांच्याकडे मोठ्या आशेने पाहिले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *