शेतकरी-विद्यार्थी-महिलांच्या प्रश्नांवर मशालींचा आक्रोश! , तिरंगा चौकातून मोर्चा; सुभाष चौकात नेताजींना अभिवादन, पाचकंदील चौकात क्रांती स्मारकाला पुष्पहार; डॉ. आंबेडकर चौकात सभेने समारोप
1 min read

शेतकरी-विद्यार्थी-महिलांच्या प्रश्नांवर मशालींचा आक्रोश! , तिरंगा चौकातून मोर्चा; सुभाष चौकात नेताजींना अभिवादन, पाचकंदील चौकात क्रांती स्मारकाला पुष्पहार; डॉ. आंबेडकर चौकात सभेने समारोप

Loading

शेतकरी-विद्यार्थी-महिलांच्या प्रश्नांवर मशालींचा आक्रोश!

तिरंगा चौकातून मोर्चा; सुभाष चौकात नेताजींना अभिवादन, पाचकंदील चौकात क्रांती स्मारकाला पुष्पहार; डॉ. आंबेडकर चौकात सभेने समारोप

अमळनेर प्रतिनिधी
क्रांती दिनानिमित्त रविवारी (९ ऑगस्ट) सायंकाळी ७ वाजता विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या वतीने अमळनेर शहरात मशाल मोर्चा काढण्यात आला. तिरंगा चौकातून मशाली हातात घेत सुरू झालेला मोर्चा सुभाष चौक, पाचकंदील चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचला. यावेळी सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
सुभाष चौकात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पाचकंदील चौकातील क्रांती स्मारकाला महिला पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.
सभेत महागाई, बेरोजगारी, पेपरफुटी, भ्रष्टाचार, शेतकरी-कष्टकरी व विद्यार्थी प्रश्न, महिलांवरील अन्याय, पिण्याच्या पाण्याची समस्या तसेच रस्ते व पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेवर केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.
अमळनेर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ ५० हजार रुपयांची मदत, शहर व ग्रामीण भागातील नुकसानीचे त्वरित पंचनामे, स्वच्छता, पिण्याचे पाणी व वैद्यकीय व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. शेतमालाला हमीभाव, शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, पाडळसरे धरणासाठी दरवर्षी ५०० कोटी रुपयांचा निधी आणि पीक विमा योजनेतील पीक कापणी प्रयोगाचा निकष रद्द करण्याची मागणीही करण्यात आली. ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी आंदोलकांनी केली.
प्रास्ताविक बी. के. सूर्यवंशी यांनी केले. ॲड. शकील काझी, चंद्रशेखर भावसार, रियाज मौलाना, बन्सीलाल भागवत, प्रा. अशोक पवार, शिवराम पाटील, सुलोचना वाघ आणि डॉ. बी. एस. पाटील यांनी महागाई, बेरोजगारी, शेतकरी, विद्यार्थी, महिला, पिण्याचे पाणी, पाडळसरे धरण व लोकशाहीच्या प्रश्नांवर मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डी. एम. पाटील यांनी केले, तर आभार श्याम पाटील यांनी मानले. राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.

मोर्चात महाविकास आघाडीसह मराठा सेवा संघ, मुस्लिम युथ सेवा फाऊंडेशन, संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, एनएसयूआय, निवृत्त सेवा संघटना, पुरोगामी क्रांती दल, प्रहार संघटना आणि साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

यावेळी प्रशांत निकम, गोकुळ बोरसे, सुरेश पिरन पाटील, योजना पाटील, ॲड. तिलोत्तमा पाटील, आरती पाटील, प्रताप आबा पाटील, गजेंद्र साळुंखे, जाकीर शेख, नरेंद्र पाटील, लोटन अण्णा चौधरी, अरुण देशमुख, प्रा.गणेश पवार, देवेंद्र देशमुख, पंढरीनाथ बागुल, ॲड. कौस्तुभ पाटील, मकसूद पठाण, प्रा. लिलाधर पाटील,डी ए पाटील, चिंधू वानखेडे, योगेश पाटील, गौतम मोरे, बाळासाहेब पाटील, नितीन निळे, ॲड. रज्जाक शेख, विजय मास्तर पाटील, वासू मामा पाटील, गोकुळ आबा पाटील, ॲड. गिरीश पाटील, योगेश सिसोदे,राकेश पवार, सुनील पाटील, संतोष पाटील व प्रवीण पवार आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *