युवकांचे नेतृत्त्व, समाजसेवा आणि विकासाचे वचन – प्रभाग १४ मध्ये निलेश महाजन
![]()
युवकांचे नेतृत्त्व, समाजसेवा आणि विकासाचे वचन – प्रभाग १४ मध्ये निलेश महाजन
अमळनेर प्रतिनिधी:(ईश्वर महाजन)
अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १४ मध्ये युवक नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे निलेश उर्फ बबलू महाजन यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अमळनेर तालुका व शहर विकास आघाडी कडून सर्वसाधारण ‘ब’ गटातून निवडणूक लढवत असलेले निलेश महाजन प्रभागातील युवकांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये लोकप्रियता वाढवत आहेत.
निलेश महाजन हे महाजन समाजाचे उदयोन्मुख नेतृत्व असून, संत सावता माळी गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी समाजकार्य, संघटनशीलता आणि शिस्तीचे उत्तम उदाहरण दिले आहे. व्यवसायाने मेडिकल प्रतिनिधी असलेले निलेश, रात्री बेरात्री आजारी पेशंट्सना मदत करतात, दवाखान्यात नेतात, आणि आवश्यकतेनुसार रुग्णालयाबाहेर उपचाराची व्यवस्था करतात. त्यांच्या या सेवाभावामुळे प्रभागातील सर्व वयोगटांतील नागरिक त्यांना आदराने पाहतात.
त्यांचे भाऊ श्री चंद्रकांत महाजन, यू ज्वेलर्स चे संचालक, व्यापारी व सामाजिक क्षेत्रात उच्च संपर्क राखतात. तसेच, त्यांच्या आजोबा कै. कृष्णा कौतिक महाजन हे अमळनेर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक होते, ज्यामुळे घराण्याची नगरपरिषदेच्या सेवेशी असलेली नाळ अजून दृढ आहे.
नगरपरिषदेच्या विकासासाठी निलेश महाजन यांचे प्रमुख मुद्दे
प्रभागातील रस्ते, ड्रेनेज व पायाभूत सुविधा सुधारणा
महिला व युवकांसाठी सांस्कृतिक-खेळ केंद्र
ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सहाय्यता उपक्रम
स्वच्छता, पाणीपुरवठा व स्ट्रीटलाइट तातडीने सुधारणा
प्रभागात नवीन पाणी टाकी व पाईपलाईन दुरुस्ती
स्थानिक रोजगाराला चालना देण्यासाठी व्यवसायिकांना प्रशासनिक सहकार्य
निलेश महाजन यांचे हे संपूर्ण व्यक्तिमत्व आणि सातत्यपूर्ण समाजसेवा प्रभाग १४ मधील मतदारांमध्ये उत्साह निर्माण करत असून, मतदानाच्या दिशेने त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात आहे.

