अमळनेरमध्ये ‘स्त्री शक्तीचा जागर’ नाटकाने महिला सशक्तीकरणाचा संदेश पसरवला
1 min read

अमळनेरमध्ये ‘स्त्री शक्तीचा जागर’ नाटकाने महिला सशक्तीकरणाचा संदेश पसरवला

Loading

अमळनेरमध्ये ‘स्त्री शक्तीचा जागर’ नाटकाने महिला सशक्तीकरणाचा संदेश पसरवला

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – संविधानाने महिलांना दिलेले हक्क अधिकार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी संविधान जागर अभियान (अमळनेर) महिला टीमने ‘स्त्री शक्तीचा जागर’ या नावाचे जबरदस्त नाटक सादर केले. संविधानाला 75 वर्षे झाली तरी आजही अनेक महिला त्यांच्या हक्क अधिकारांची पूर्ण जाणीव नसल्याने, या नाटकाद्वारे समाजात जनजागृती करणे हे उद्दिष्ट आहे.
या नाटकात दिशा संदाशिव, सुनीता मोरे, भारती कोळी, उषा देवरे, योगिता पांडे, रोहिणी शिरसाठ, माधुरी पाटील आणि श्रद्धा रेखा राजेंद्र या सर्व महिला सहभागी होत्या. त्यांनी आपल्या प्रगल्भ अभिनयाने उपस्थित महिलांना मंत्रमुग्ध केले.
रुबजीनगर वस्तीतील महिला भगिनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होत्या आणि त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन नाटकाच्या संदेशाचे स्वागत केले. संविधान जागर अभियान (अमळनेर) चे प्रा. अशोक पवार यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले आणि महिला सहभागींचे कौतुक करत त्यांना मार्गदर्शन केले.
आधार संस्थेच्या डॉ भारती पाटील, योगिता पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या समन्वयामुळे हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. ‘स्त्री शक्तीचा जागर’ नाटक 26 नोव्हेंबरपर्यंत अमळनेरच्या विविध भागात सादर होणार आहे, त्यामुळे नागरिकांनी हे नक्की बघावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *