अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अमळनेर तर्फे डॉ. अर्पणा देशमुख यांचा गौरव*
1 min read

अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अमळनेर तर्फे डॉ. अर्पणा देशमुख यांचा गौरव*

Loading

*अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अमळनेर तर्फे डॉ. अर्पणा देशमुख यांचा गौरव*

अमळनेर- दि. २० नोव्हेंबर २०२५ – समाजातील निराधार व वंचित वृद्धांच्या सेवेसाठी समर्पित कार्य करणाऱ्या आभाळमाया संस्थेच्या प्रमुख डॉ. अर्पणा देशमुख यांचा अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अमळनेर तर्फे शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम मकसूद बोहरी यांच्या निवासस्थानी पार पडला.

अलीकडेच १६ नोव्हेंबर रोजी, नवी दिल्ली येथे रोटरी इंटरनॅशनल तर्फे डॉ. देशमुख यांना प्रतिष्ठित “तेजस चेंज मेकर पुरस्कार” सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व सन्माननिधीसह प्रदान करण्यात आला होता. समाजसेवेत त्यांच्या सातत्यपूर्ण योगदानाची ही आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा दखल घेण्यात आली.

अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांत सचिव तथा माजी जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल देशमुख व सौ. निर्मला देशमुख यांची कन्या असून, यापूर्वी त्यांना मदर टेरेसा अवॉर्डसह अनेक मान्यवर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. माजी राष्ट्रपती सौ. प्रतिभाताई पाटील आणि स्व. सिंधुताई सपकाळ यांनीही त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

डॉ. देशमुख यांनी गेली १५ वर्षे कोणतीही सरकारी मदत न घेता पुणे स्थित आभाळमाया वृद्धाश्रमाच्या माध्यमातून सुमारे ५,००० हून अधिक वृद्धांना निवारा दिला असून ३,००० पेक्षा जास्त वृद्ध रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात संस्थेने मदत केली आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष सतीश देशमुख यांनी केले तर स्वागत जिल्हा उपसचिव मकसूद बोहरी यांनी केले. डॉ. देशमुख यांचे सुपुत्र डॉ. अमित देशमुख व डॉ.नीता यांचाही सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी श्री मंगल ग्रह मंदिराचे कोषाध्यक्ष गिरीश कुलकर्णी व उपाध्यक्ष बहिरम सर, तसेच ग्राहक पंचायतचे सौ. कपिला मुठे, सुनील वाघ, ताहा बुकवाला, भाऊसाहेब देशमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. वनश्री अमृतकर यांनी केले. अशी माहिती सौ. मेहराज बोहरी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *