शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत अनिल बोरनारे आंदोलनाचा तयारीत. शिक्षणाधिकारी शिक्षण उपसंचालकांकडे मार्गदर्शन मागून शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित ठेवतात- अनिल बोरनारे यांचा आरोप
![]()
शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत अनिल बोरनारे आंदोलनाचा तयारीत.
शिक्षणाधिकारी शिक्षण उपसंचालकांकडे मार्गदर्शन मागून शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित ठेवतात- अनिल बोरनारे यांचा आरोप
ठाणे: कल्याण ( मनिलाल शिंपी) शिक्षकांच्या सेवाशर्तीची अनेक प्रकरणं सोडवण्यासाठी शिक्षण अधिकारी सक्षम असताना देखील ही प्रकरण शिक्षण उपसंचालकांकडे पाठवून विलंब करत असल्याचा आरोप अनिल बोरनारे यांनी केला असून तातडीने ही सर्व प्रकरण निकाली न काढल्यास ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा मुंबई मुख्याध्यापक संघटना उत्तर विभाग अध्यक्ष व भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांनी शिक्षण उपसंचालकांना केला आहे
याबाबत अनिल बोरनारे यांनी मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांना निवेदन देऊन ही प्रकरण सोडवण्याची मागणी केली आहे
मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे मुंबईतील बृहन्मुंबई शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण व पश्चिम विभाग हे जिल्हे तर ठाणे रायगड व पालघर जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालय तसेच ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका नगरपालिका व जिल्हा परिषद अंतर्गत शाळा यांचा समावेश होतो या कार्यालयांच्या अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील शिक्षक शिक्षकेतरांचे प्रश्न शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे येत असतात यातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षण अधिकारी सक्षम असून सुद्धा शिक्षण उपसंचालकांकडे मार्गदर्शन मागून त्यांच्याकडे प्रस्ताव पाठवला जातो व शिक्षकांची प्रश्न प्रलंबित राहतात याबाबत शिक्षण उपसंचालकांनी त्यांच्या कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना आदेश देऊन सर्व प्रश्न तातडीने सोडवण्याचे आदेश निर्गमित करावे अन्यथा याबाबत मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष व भाजपाचे प्रदेश कार्यकारणी निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांनी आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

