सर्वसामान्यांचा नेता, शहर बदलण्याचा नवा विश्वास — जितेंद्र ठाकूर यांना मिळतोय नागरिकांचा जोरदार पाठिंबा
1 min read

सर्वसामान्यांचा नेता, शहर बदलण्याचा नवा विश्वास — जितेंद्र ठाकूर यांना मिळतोय नागरिकांचा जोरदार पाठिंबा

Loading

सर्वसामान्यांचा नेता, शहर बदलण्याचा नवा विश्वास — जितेंद्र ठाकूर यांना मिळतोय नागरिकांचा जोरदार पाठिंबा

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय तापमान वाढले असून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार म्हणून जितेंद्र (जितू) ठाकूर यांचे नाव चर्चेत आहे. सर्वसामान्य कुटुंबातून स्वबळावर पुढे आलेल्या आणि शहरातील दैनंदिन समस्या प्रत्यक्ष जाणणाऱ्या जितेंद्र ठाकूर यांना नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. शहरभर या उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चेला उधाण आलेले दिसते.
गेल्या दोन दशकांपासून पत्रकारितेतून सक्रिय असलेले जितेंद्र ठाकूर यांनी शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, नालेसफाई, कचरा व्यवस्थापन तसेच सार्वजनिक आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर आवाज उठवला आहे. या प्रयत्नांमुळे ते ‘जनतेचा उमेदवार’ म्हणून ओळखले जात आहेत. शहराच्या सर्व भागांत तसेच राजकीय, सामाजिक व व्यवसायिक क्षेत्रात त्यांचे नाव परिचित आहे.
जितेंद्र ठाकूर यांचे शहराच्या सर्वांगीण विकासाचे ठोस व्हिजन, नागरिकांच्या रोजच्या छोट्या-छोट्या अडचणी सोडवण्याची तत्परता आणि कोणत्याही वैमनस्यापलीकडे जाऊन काम करण्याची वृत्ती मतदारांना भावते. “शहराचा सामान्य माणूस कोणत्या अडचणींना रोज सामोरे जातो, याची प्रत्यक्ष जाण जितेंद्र ठाकूर यांना आहे,” असे अनेक नागरिक म्हणत आहेत.
शहरातील व्यापारी, बाजारपेठ आणि नव्याने विकसित होणाऱ्या भागांतही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नागरिक प्रत्यक्ष भेटून त्यांना पाठिंबा देत आहेत. युवा मतदारांमध्येही त्यांची लोकप्रियता वाढते आहे; “शहर बदलायचं असेल तर स्थानिक आणि काम करणारा नेता हवा,” अशी भावना व्यक्त होत आहे. पारदर्शक, जवाबदार आणि नागरिकांशी संवादावर आधारित प्रशासन देण्याची क्षमता त्यांच्यात असल्याचे समर्थक म्हणतात.

या निवडणुकीत जितेंद्र ठाकूर यांना मिळणारा प्रतिसाद पाहता त्यांचा विजय निश्चित दिसतोय, असे समर्थक ठामपणे सांगत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *