तामझाम नाही, फक्त काम! — सुनील महाजन यांची साध्या पद्धतीने दाखल केली अपक्ष उमेदवारी   प्रभाग 13 ब मध्ये नवपरिवर्तनाची हाक — सुनील महाजन अपक्ष उमेदवारीसह उमटले जनतेच्या अपेक्षांचा विश्वास
1 min read

तामझाम नाही, फक्त काम! — सुनील महाजन यांची साध्या पद्धतीने दाखल केली अपक्ष उमेदवारी प्रभाग 13 ब मध्ये नवपरिवर्तनाची हाक — सुनील महाजन अपक्ष उमेदवारीसह उमटले जनतेच्या अपेक्षांचा विश्वास

Loading

तामझाम नाही, फक्त काम! — सुनील महाजन यांची साध्या पद्धतीने दाखल केली अपक्ष उमेदवारी

प्रभाग 13 ब मध्ये नवपरिवर्तनाची हाक — सुनील महाजन अपक्ष उमेदवारीसह उमटले जनतेच्या अपेक्षांचा विश्वास

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील युवा सामाजिक कार्यकर्ते सुनील महाजन यांनी नुकताच प्रभाग 13 ब मध्ये अपक्ष उमेदवारी दाखल केली. या सोहळ्यात कोणत्याही प्रकारचा ताम-झाम, वाजा-फटाके किंवा पोस्टर्स नव्हते; सर्व काही अत्यंत साध्या, सरळ आणि स्वच्छ पद्धतीने पार पडले.
उमेदवारी फॉर्म सादर करण्यासाठी उपस्थित असलेले नागरिक विविध समाजातील होते — माळी, भोई, कोळी, तेली, चौधरी, वाणी, धोबी, न्हावी, ब्राह्मण, साळी, मुस्लिम, चांभार, कासार, पाटील, बारी, बडगुजर आणि प्रभागातील सर्वसामान्य लोक उपस्थित होते. सुनील महाजन यांनी कोणताही मोठा शक्ती प्रदर्शन न करता, जनतेशी संवाद आणि कामावर लक्ष केंद्रित करत उमेदवारी दाखल केली.
प्रभागातील मतदारांच्या मते, अनेक कामे रखडलेली आहेत आणि आता नव नेतृत्वाची गरज भासते. सुनील महाजन यांच्याकडे ठोस कामाचे व्हिजन आहे आणि त्यांनी प्रभागातील समस्या प्रत्यक्ष अनुभवल्या आहेत. त्यामुळे प्रभागातील मतदार त्यांच्या पाठीशी उभे राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सुनील महाजन म्हणतात, “मिरवणूक, मोठा ताम-झाम नव्हे, फक्त काम आणि जनतेच्या सेवा हाच माझा मार्ग आहे. प्रभाग 13 ब मध्ये नव्या नेतृत्वाची हाक आहे आणि ती हाक पूर्ण करण्यासाठी मी येतोय.”
या अपक्ष उमेदवारीच्या घोषणेनंतर प्रभागात जनतेमध्ये उत्सुकता आणि सकारात्मक चर्चा वाढली असून, मतदार नव्या, प्रामाणिक आणि कामावर लक्ष देणाऱ्या नेतृत्वासाठी तयार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *