अमर वीर क्रांतीकारी चंद्रशेखर आझाद यांचा वारसा अमळनेरमध्ये — नातू अमित आझाद व नेहा आझाद यांची भागवताचार्य कमलेश महाराजांच्या घरी खास भेट”
1 min read

अमर वीर क्रांतीकारी चंद्रशेखर आझाद यांचा वारसा अमळनेरमध्ये — नातू अमित आझाद व नेहा आझाद यांची भागवताचार्य कमलेश महाराजांच्या घरी खास भेट”

Loading

अमर वीर क्रांतीकारी चंद्रशेखर आझाद यांचा वारसा अमळनेरमध्ये — नातू अमित आझाद व नेहा आझाद यांची भागवताचार्य कमलेश महाराजांच्या घरी खास भेट”

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
हिंदुस्तानच्या स्वातंत्र्य आंदोलनाला दिशा देणारे, क्रांतीची जाज्वल्य ज्योत पेटवणारे अमर शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या कुटुंबातील वारसदार अमित आझाद व नेहा आझाद यांनी अमळनेर तालुक्यातील जैतपीर येथे ऐतिहासिक भेट दिली. हिंदूस्तान रिपब्लिकन आर्मी महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष भागवताचार्य कमलेश महाराज कुलकर्णी यांच्या घरी येऊन त्यांनी सदिच्छा भेट घेऊन मुक्त संवाद साधला.
जैतपीर येथील या भेटीमुळे परिसरात उत्साहाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले. क्रांतीकारकांच्या घराण्यातील व्यक्ती येथील भूमीत येत असल्याने स्थानिक ग्रामस्थांनीही आनंद व्यक्त केला. अमर शहीद आझाद यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या अमित आझाद यांनी समाजकारण, युवक जागृती आणि राष्ट्रभक्ती या विषयांवर चर्चा केली.
भागवताचार्य कमलेश महाराज यांनीही क्रांतिकारी परंपरा, सध्याची सामाजिक परिस्थिती आणि हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मीचे राष्ट्रसेवा विषयक उपक्रम याबद्दल माहिती दिली. या भेटीत परस्पर आदान–प्रदान, राष्ट्रनिष्ठा आणि सामाजिक कार्याची नवचेतना दिसून आली.
अमळनेर परिसरात या ऐतिहासिक भेटीची मोठी चर्चा असून, क्रांतिकारी चंद्रशेखर आझाद यांच्या वंशजांचा सन्मान करण्याची संधी लाभल्याने नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *