जनतेच्या अपेक्षा, नवनेतृत्वाची हाक — प्रभाग 13 ब मध्ये सुनील महाजन यांची जोरदार चर्चा”
![]()
“जनतेच्या अपेक्षा, नवनेतृत्वाची हाक — प्रभाग 13 ब मध्ये सुनील महाजन यांची जोरदार चर्चा”
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
प्रभाग 13 ब मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून एकाच नेतृत्वाचा प्रभाव राहिल्याने स्थानिक पातळीवरील मूलभूत समस्या कायम प्रलंबित आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता यांसारख्या रोजच्या गरजा आणि प्रश्नांवर ठोस उपाययोजना नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. अशातच नवे, अभ्यासू आणि निस्वार्थी नेतृत्व प्रभागाला हवे असल्याची जोरदार मागणी नागरिकांमध्ये होत आहे. या मागणीच्या केंद्रस्थानी सध्या सुनील महाजन हे नवीन नाव ठळकपणे पुढे येत आहे.
शिक्षण, अनुभव, समर्पित वागणूक आणि मितभाषी व्यक्तिमत्त्व यामुळे सुनील महाजन यांना प्रभागातील मतदारांचा वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे. मागील 20 ते 25 वर्षांत काही विशिष्ट समाजातील लोकांनीच राजकारणावर वर्चस्व ठेवल्याने इतर समाजातील योग्य, पात्र आणि अभ्यासू व्यक्तींना संधी मिळत नसल्याचीही नाराजी मतदारांमध्ये व्यक्त होत आहे. “आता प्रभाग बदलायला हवा, नवे चेहेरे हवे”—अशी चर्चा नागरिकांमध्ये वाढत आहे.
समाजातील सर्व घटकांना समान संधी देणारे, कायद्याचे ज्ञान असलेले आणि निस्वार्थी वृत्तीने काम करणारे नेतृत्व मिळावे, अशी लोकांची मागणी आहे. त्यातच सुनील महाजन यांनी पोलीस खात्यातील मानाची नोकरी सोडून थेट समाजकारणासाठी उभे राहण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्याबद्दल आदर आणि अपेक्षा दुणावल्या आहेत. “मी पद किंवा पैशासाठी नाही, फक्त आणि फक्त बदलासाठी आलो आहे,” असा त्यांचा ठाम संदेश नागरिकांपर्यंत पोहोचत आहे.
“किरकोळ प्रश्नही आता पर्यंत सुटू शकले नाहीत; मग आपणच पुढाकार घ्यायला नको का?” असा प्रश्न नागरिक स्वतःला विचारताना दिसतात. सुनील महाजन म्हणतात, “मी फक्त निमित्त; सुधारणा तुमच्या हातात आहे. माझ्या जमिनीवरचे संस्कार, स्वच्छ चारित्र्य आणि सामाजिक बांधिलकी घेऊनच मी या रिंगणात उतरलो आहे. साथ तुमची—काम माझे. आता नाही तर कधी? मी नाही तर कोण?”
प्रभाग 13 ब मध्ये आता नवपरिवर्तनाची हवा जाणवते आणि त्यामध्ये सुनील महाजन हे नाव जनतेच्या चर्चेच्या केंद्रस्थानी पोहोचले आहे.

