शिक्षण,कौशल्य,अभ्यास व ज्ञान जीवनाचे मंत्र -धीरजकुमार वाघूलदे यांचे प्रतिपादन ———————————————- ● माझे जीवन,माझे शिक्षण यावर व्याख्यान संपन्न ● स्व.प्रा.र.का.केले यांच्या स्मरणार्थ व्याख्यानाचे आयोजन ● सहभाग व प्रशिक्षण यावर दिले भर
![]()
शिक्षण,कौशल्य,अभ्यास व ज्ञान जीवनाचे मंत्र
-धीरजकुमार वाघूलदे यांचे प्रतिपादन
———————————————-
● माझे जीवन,माझे शिक्षण यावर
व्याख्यान संपन्न
● स्व.प्रा.र.का.केले यांच्या स्मरणार्थ
व्याख्यानाचे आयोजन
● सहभाग व प्रशिक्षण यावर दिले भर
———————————————–
अमळनेर : येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज(स्वायत्त) अंतर्गत रोजगार समुपदेशन आणि मार्गदर्शन केंद्र(सीसीएमसी),राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान(रुसा),अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष( आयक्यूएसी) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझे जीवन,माझे शिक्षण’ या विषयावर विशेष प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रस्तुत कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एच डी जाधव हे होते.
प्रारंभी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची जयंती आणि आचार्य विनोबा भावे यांच्या स्मृती दिन निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख मार्गदर्शक सुधीरकुमार वाघूलदे,प्राचार्य डॉ एच डी जाधव,उपप्राचार्य डॉ कल्पना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख मार्गदर्शक सुधीर वाघूलदे यांनी यावेळी सव्वा तास शिक्षण व जीवन यासंबंधी विस्तृतपणे मागर्दशन केले आणि सर्व विद्यार्थ्यांना चर्चेत सहभागी करून घेतले.
ते म्हणाले की,आज यशस्वी जीवनाचे मंत्र समजून घेणे आवश्यक आहे, हे जीवन आपले आहे आणि कुटुंब जीवन मूल्य देणारे एक महत्वपूर्ण केंद्र आहे.
विद्यार्थ्यांच्या यशासाठी सहभाग आणि प्रशिक्षण असणे गरजेचे आहे.
आपल्या आयुष्यासाठी महत्वाचे आहे
पैसा,चिंतन,आरोग्य यासाठी
साध्य करिअर हेच आहे तर साधन म्हणून शिक्षण सुद्धा महत्वाचे आहे.
आपण नोकरी व व्यवसाय नियोजनबद्ध पद्धतीने करणे फार आवश्यक आहे.
समाजमान्य व शासनमान्य जे अधिकार असतात, घोषणा असतात त्यांचे पालन होणे आवश्यक आहे,तुमचं असंण कृती देते आणि कृती निकाल देते,त्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण (quality education) घ्यावं लागेल,कौशल्याचा विकास,समर्पण भावनेने कार्य करणे उज्वल यशासाठी आवश्यक आहे.
यासाठी जिद्द,चिकाटी आणि आत्मविश्वासाने प्रत्येक कृती होणे आवश्यक आहे.
शिक्षण+कौशल्य+अभ्यास+ज्ञान हेच जीवनाचे मंत्र अथवा फार्मूलाआहे असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी प्र.प्राचार्य डॉ.जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात म्हणाले की,विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने व परिश्रमाने आपले साध्य पूर्ण करावे,यासाठी सर्व विद्यार्थ्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सिनेट् सदस्य डॉ.धिरज वैष्णव, डॉ.संदीप नेरकर,डॉ.धनंजय चौधरी, डॉ.अमित पाटील,प्रा.मिलिंद ठाकरे,डॉ.निलेश पवार,डॉ व्ही बी मांटे, डॉ निलेश चित्ते,डॉ जितेंद्र पाटील,प्रा.नितीन पाटील, डॉ.हेमंत पवार, प्रा.वैशाली राठोड, डॉ.विवेक बडगुजर,डॉ योगेश तोरवणे, डॉ.ज्ञानेश्वर मराठे, डॉ.माधव भुसनर,डॉ.ज्ञानेश्वर कांबळे,डॉ.सुनिल राजपूत,
प्रा.योगेश पाटील,डॉ.महेंद्र महाजन,
डॉ.रवी बाळसकर, डॉ.रवींद्र मराठे,
प्रा.जयेश साळवे,डॉ.विलास गावित,
डॉ.अनिल झळके,डॉ.किरण गावित,
प्रा.भाग्यश्री जाधव,ग्रंथपाल दिपक पाटील,प्रा.विजय साळुंखे,डॉ.अमोल मानके,डॉ.संतोष दिपके,प्रा.अतुल पाटील, डॉ.किरण सुर्यवंशी, डॉ.किरण भागवत,डॉ.बालाजी कांबळे,प्रा.हेमलता सूर्यवंशी, डॉ.प्रियंका पाटील,डॉ.राखी घरटे,प्रा.सोनूसिंग पाटील,डॉ.हर्ष नेतकर,प्रा.ईशिता घोष,प्रा.चित्रा मलेला,प्रा.कैलास बागुल,प्रा.प्रसाद मुठे,प्रा.दिलीप तडवी यांच्यासह विविध विद्याशाखेचे अनेक प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रस्तुत कार्यशाळेसाठी श्री.अजयभाऊ केले,सीसीएमसी विभागाचे प्रा.अमोल अहिरे,
डॉ.आकाश गव्हाणे, पराग रवींद्र पाटील,
दिलीप शिरसाठ, प्रा.हिमांशू गोसावी,अतुल धनगर,दिपक चौधरी,विशाल अहिरे तसेच
पदार्थविज्ञान विभागाचे पवन शर्मा, विश्वास पाटील,अंबादास चावरीया आदींनी सहकार्य केले.
प्रस्तुत कार्यशाळेचे सूत्र संचालन करिअर कौन्सिलिंग सेंटरचे प्रमुख डॉ.विजय तुंटे यांनी केले तर आभार डॉ.जितेंद्र पाटील यांनी मानले.

