अमळनेर माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांना पिताशोक; आज त्यांची अंत्ययात्रा
![]()
अमळनेर माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांना पिताशोक; आज त्यांची अंत्ययात्रा
अमळनेर प्रतिनिधी– आपल्या शहराचे माजी आमदार श्री शिरीष चौधरी यांचे वडील व अखिल भारतीय तैलिक महासभेचे प्रांतीय उपाध्यक्ष, समाज भूषण काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी यांचे अल्पशा आजाराने आज पहाटे सुमारे ३ वाजता दुःखद निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.
त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या अंत्ययात्रेचे कार्यक्रम आजच, दि. १५ नोव्हेंबर, शनिवार रोजी दुपारी ३ वाजता त्यांच्या राहते घरापासून प्रारंभ होऊन, कोकणी हिल, दंडपाणेश्वर रोड, नंदुरबार येथील सहकार महर्षी पी.के. पाटील महाविद्यालय प्रांगणात अंतिम संस्कार विधी होणार आहेत.
शोकाकुल कुटुंबात श्री. अशोक वसंतलाल चौधरी, श्री. रविंद्र हिरालाल चौधरी, श्री. श्यामकुमार वसंतलाल चौधरी, श्री. विजय वसंतलाल चौधरी, श्री. शिरीष हिरालाल चौधरी, श्री. नरेंद्र हिरालाल चौधरी व समस्त अहिरराव परिवार यांचा समावेश आहे.
समस्त सूर्यवंशी कुटुंब व अमळनेर शिवसेना विधानसभा ,पदाधिकारी, मित्रपरिवार, अमळनेर तालुका शिरीषदादा मित्र परीवार,
ग्रामस्थ मुडी बोदर्डे, ता. अमळनेर यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

